सहा महिन्यांपूर्वी यशस्वीपणे नोकर भरती प्रक्रिया राबविणाऱ्या पुणे महानगरपालिकेत आता आणखी एक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवार 28 मार्चपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या अगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

महापालिकेकडून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. जवळपास 448 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक अशा विविध पदांचा समावेश होता.

विशेष म्हणजे खूप पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात आली आणि उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या देखील देण्यात आल्या. यामुळे महापालिका प्रशासनाचे कौतुक देखील होत आहे. यामुळे महापालिकवरील विश्वास देखील वाढला आहे.

दरम्यान, महापालिकेत अजूनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग -1 ते वर्ग -3 मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन या विभागातील पदांसाठी ही भरती असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती..

क्ष – किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) (8 पदे), वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी (20 पदे), उप संचालक ( प्राणी संग्रहालय ) ( 1 पद), पशु वैद्यकीय अधिकारी (2 पदे), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (20 पदे), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (10 पदे), आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (40 पदे), वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (3 पदे), औषध निर्माता (15 पदे), पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर ) (1 पद) .

पुणे महापालिका भरती : पदे, शिक्षण, पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

पुणे महापालिका भरती : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *