पुणे महापालिकेने मिळकत करात 40 टक्के सवलत मिळवण्यासाठी पीटी 3 हा अर्ज भरून महापालिकेकडे जमा करावा लागणार असल्याने तो अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. हा अर्ज भरून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह नागरी सुविधा केंद्र येथे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मिळकतधारकांच्या सोयीच्या दृष्टीने पीटी 3 अर्ज आपल्या नजीकच्या संपर्क कार्यालय / क्षेत्रीय कार्यालय / म प / मुख्य कार्यालय येथे नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक यांच्याकडे जमा करता येणार आहे.

दि. 01.04.2019 पूर्वीच्या ज्या निवासी मिळकतींना 40 टक्के सवलत देण्यात आली आहे, ज्यांची सवलत आजही कायम आहे. त्यांनी पुन्हा पीटी 3 अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.

40 टक्के सवलतीकरिता पीटी 3 अर्ज संपर्क कार्यालय / क्षेत्रीय कार्यालय / मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांच्या कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. तसेच संकेतस्थळावरदेखील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सवलत प्राप्त करण्याकरिता या अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

1) मिळकतीचा वापर स्वतः राहण्यासाठी करीत असल्याबाबत सोसायटीचे ना हरकत पत्र (सोसायटी असल्यास) ,

2 ) मतदान ओळखपत्र / पास पोर्ट / वाहनचालक परवाना / गॅस कार्ड / रेशनकार्ड इ.

3 ) पुणे शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत.

4) पीटी 3 अर्जासोबत वरील सक्षम पुराव्याची कागदपत्रे व 25 रुपये चलन फी भरून नजीकच्या संपर्क कार्यालय / क्षेत्रीय कार्यालय / मुख्य कार्यालय / नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांच्याकडे अर्ज जमा केल्यानंतर पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी करून करआकारणी व करसंकलन प्रमुख यांच्याकडून प्रकरण अंतिम करण्यात येईल.

अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग

मिळकतकराच्या 40 टक्के सवलतीचा अर्ज (PDF) ऑनलाईन :- इथे क्लिक करा 

व्हेबसाइट :- https://propertytax.punecorporation.org/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *