जालना बँके-पाठोपाठ आता ‘या’ जिल्हा-बँकेचे 49,961 शेतकरी पात्र ; 50,000 खात्यात जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला कधी मिळणार हप्ता ?
शेतीशिवार टीम : 20 सप्टेंबर 2022 :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना : 2019 अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार
जालना जिल्हा सहकारी बँकेच्या विविध शाखांमधील 26 हजार 223 खातेदारांची माहिती पोर्टलवर www.jalnadccbank.com अपलोड करण्यात आली असून आता औरंगाबाद जिल्हा बँकेनेही छाननी अंती पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2022-23 या वित्तीय वर्षासाठी रु. 4700.00 निधींपैकी पहिला हप्ता हा 2350.00 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबाबतचा शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 16 सप्टेंबर रोजी काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात याबाबतचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले होते . मात्र त्याच वेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी पुढे आली होती.
त्यानुसार 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षात घेतलेल्या अल्पमुदती पीककर्जाच्या परतफेडीची दिनांक विचारात घेऊन कर्जाची मुद्दल व व्याजासह पूर्णतः परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय 27 जुलै 2022 रोजी मंत्रिमंडळाने घेतला.
29 जुलै रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन आदेश काढण्यात आला. या योजनेचा लाभ देताना वैयक्तीक शेतकरी हा निकष विचारात घेऊन एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेली अल्पमुदत पीक कार्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम बँकांनी निश्चित करावयाची आहे.
तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुध्दा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र ठरणार आहेत . 2019 या वर्षात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, असे शेतकरी देखील सदर योजनेस पात्र ठरणार आहेत. राज्यात जवळपास 14 लाख शेतकरी पात्र ठरणाऱ्या शक्यता आहे.
एडीसीसी बँकेचे (adccbank) 49 हजार शेतकरी ठरले पात्र…
प्रोत्साहन योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 1 लाख 75 हजार शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यांना जवळपास 300 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 75 हजार शेतकऱ्यापैकी 49 हजार 961 शेतकरी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित 1 लाख शेतकरी विविध राष्ट्रीयकृत बँकचे आहेत.
३१ ऑगस्टपर्यंत सर्व याद्यांचे ऑडीट करण्यात आले आहे . त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी मोबाइल क्रमांक आणि आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी . प्रसिद्ध करण्यात आली. मोबाइल आणि आचार लिक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 सप्टेंबर रोजी प्रोत्साहन रक्कम टाकली जाणार असे सांगण्यात आले होते. परंतु निधीच १६ सप्टेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे विलंब झाला होता.
प्रोत्साहन अनुदानासाठी बँकांना येत आहे या अडचणी…
1) बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी अद्यापही आपल्या बँक खात्याशी मोबाइल क्रमांक आणि आधार लिंक केलं नाहीये…
2) कोरोनाकाळात ज्या पात्र शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहे, त्यांचा खरा वारसदार कोण ? याबाबत बँकांना अडथळा निर्माण होत आहे.
3) शेतकऱ्यांना असा भ्रम झाला आहे की, आम्ही वेळेवर कर्ज परतफेड केली आहे मग डायरेक्ट 50 हजारांचा हप्ता खात्यात जमा होणार आहे. परंतु ही प्रोसेस खूप गुंतागुंतीची असल्याने पात्र शेतकऱ्यांनी आपापल्या बँकेशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपलं नाव यादीत आहे की नाही ते पाहावं.
4) लाभार्थी याद्या राष्ट्रीय बँक, जिल्हा बँक, सोसायट्यांकडे जमा झाल्या असून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट द्या…