Share Market : फक्त 10 दिवसांत पैसा डबल…10 रुपयांच्या शेयर्सने आठवडाभरात केले 2 लाख रु. पहा, तुमच्याकडे आहे का ?
शेतीशिवार टीम : 20 सप्टेंबर 2022 :- शेअर बाजार (Stock Market) हा अतिशय अस्थिर व्यवसाय मानला जातो. यामध्ये कोणता शेअर गुंतवणूकदारांना कधी जमिनीवरून आकाशात नेईल, हे सांगता येत नाही. व्हॅलेन्सिया न्यूट्रिशनच्या (Valencia Nutrition Ltd) शेयरनेही असचं काहीसं केलं आहे. या शेयरने केवळ 10 दिवसांत उत्कुष्ट रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. काल सोमवारी देखील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.
इतकी वाढली शेअरची किंमत :-
जीवनशैलीतील (Life Style) आजारांना रोखण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी Multi-Nutrient Beverages संशोधन, डेव्हलपिंग आणि मार्केटिंग यावर लक्ष केंद्रित करून, कंपनीने गेल्या काही दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. Business Today च्या अहवालानुसार, 5 सप्टेंबर 2022 रोजी व्हॅलेन्सिया न्यूट्रिशन शेअर्स 10.95 रुपयांवर बंद झाले, परंतु गेल्या 10 दिवसांत त्याचे शेअर मूल्य 21.25 रुपयांवर पोहोचले आहे. याचा अर्थ या शेयर्सने गेल्या 10 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
1 लाखांचे झाले 1.94 लाख रुपये :-
दहा दिवसांपूर्वी स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती आज 1.94 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. मागील सत्रात शेअर 19.32 रुपयांवर बंद झाला होता. तो आजच्या सत्रात 10 टक्क्यांच्या वरच्या सर्किटमध्ये अडकला होता.
BSE वर कंपनीचे मार्केट कॅप 11.87 कोटी रुपये झाले. व्हॅलेन्सिया न्यूट्रिशन स्टॉक 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग अव्हरेजपेक्षा जास्त व्यापार करत आहे, परंतु 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अव्हरेजपेक्षा कमी आहे.
कंपनीचे मार्केट कॅम्प किती आहे…
व्हॅलेन्सिया न्यूट्रिशन कंपनीच्या प्रोडक्शनमध्ये ‘Bounce Superdrinks’ आणि ‘Bounce Superwater Vitamin’ यांचा समावेश आहे. शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 11.87 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, 91 सार्वजनिक भागधारकांकडे फर्मचे 36.12% किंवा 20.17 लाख शेयर्स होते.
मागील तिमाहीत, 12 प्रवर्तकांकडे 63.88% किंवा 35.67 लाख शेयर्स होते. 60 सार्वजनिक भागधारकांकडे फर्मचे 2.56 लाख शेअर्स आहेत, 2 लाखांपर्यंत वैयक्तिक भागभांडवल 4.60% आहे.