शेतीशिवार टीम : 13 ऑक्टोबर 2022 :- राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 2017-18, 2018 19, 2019-20 या तीन वर्षांत सलग किमान दोन वर्ष कर्ज घेऊन नियमित परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना म. जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ( 2019) प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्ताच सहकार विभागाच्या माध्यमातून पोर्टलवर याद्याही अपलोड झाल्या आहेत आहेत. त्यामुळे आता नक्कीच दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना हे प्रोत्सहनपर अनुदानाचे 50,000 रु. गिफ्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या सर्व जिल्ह्यांच्या याद्या https://mjpsky.maharashtra.gov.in/ या व्हेबसाईट्वर अपलोड करण्यात आल्या आहेत. परंतु या सर्व गावनिहाय याद्या आणि आपलं नाव चेक करण्यासाठी तुम्हाला आपले सेवा केंद्र (CSC) सेंटरवर जाऊन पाहता येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात – लवकर CSC सेंटरला भेट द्यायला हवी..
तत्पूर्वी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार प्रमाणिकरण करून कर्ज रकमेची खातरजमा केल्यानंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. या अनुदानाचे 2 टप्पे करण्यात आले असून लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 49 हजार शेतकरी पात्र झाले आहेत.
50,000 अनुदान खात्यावर असे होणार जमा…
प्रोत्साहनपर अनुदानास पात्र शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक (V. K) आजपासून दिला जाणार आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी ई – महासेवा केंद्र तसेच आपलं खाते असलेलया बँकेमार्फत आधारकार्ड प्रमाणिकरण करायचे आहे. त्यानंतर आधार प्रमाणिकरण (Adhar Authentication) व कर्ज रक्कमेची खात्री करून घ्यायची आहे. नंतर प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या सेव्हिंग अकाऊंटवर जमा होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे बँक अकाउंट लिंक, ज्यांच्या नावात, आधारकार्ड लिंक, खाते क्रमांकात चुका झाल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी निराश होऊ नका, कारण त्या शेतकऱ्यांची नावे ही दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 4 हजार 700 कोटींपैकी पहिल्या हप्त्याचा 2350.00 कोटींचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे नाव आलं नसेल किंवा अन्याय होत असेल तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अंतर्गत समिती आहे . ही समिती शेतकऱ्यांवरील अन्याय निवारण करेल. विशेषतः कर्जाची रक्कम शेवटच्या वर्षात किती होती, त्या रकमेच्या अनुषंगाने प्रोत्साहनपर अनुदान मिळेल.
या योजनेअंतर्गत लातूर जिल्हा सहकारी बँकेने 1 लाख 63 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाला दिली. एवढ्या शेतकऱ्यांतून 49 हजार शेतकऱ्यांची नावे पात्र यादीत आली आहेत. त्यामुळे आता उरलेलया पात्र शेतकऱ्यांना आता दुसर्या टप्प्यात हा लाभ मिळणार आहे.
तसेच पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया 12/10/2022 ते दि. 17/10/2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश बँकांसहित CSC सेंटर चालकांना दिले आहे. सदर मुदतीत कोणीही रजेवर जाणेचे नाही. तसेच ऑफिस वेळेपेक्षा जास्त वेळ थांबून आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही कारवायची आहे. यामध्ये हलगर्जीपणा झालेस संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असे स्पष्ट आदेश दिले आहे.
त्यामुळे दिवाळीपूर्वी खात्यात 50,000 रु, जमा होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.