देशातली सर्वात सेफ इलेक्ट्रिक SUV, 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह 521Km रेंज, फक्त 7 चं 100 चा वेग ; किंमतही स्वस्त, पहा, जबरदस्त फीचर्स
तुम्हीही स्वतःसाठी इलेक्ट्रिक कार प्लॅन करत असाल तर भारतात पहिल्यांदाच BYD कंपनीची Atto 3 ही सर्वात सेफ इलेक्ट्रिक SUV 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह लॉन्च झाली आहे. या ई-कार ला युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे. कंपनीने Atto 3 चे बुकिंग सुरु केलं आहे. तुम्ही 50,000 रुपये टोकन रक्कम भरून ही कार बुक करू शकता. कंपनीचं म्हणणं आहे की, ते जानेवारी 2023 मध्ये पहिले 5000 बुकिंगची डिलिव्हरी करेल. तसेच, पुढील वर्षी देशातील 15,000 स्थानिक पातळीवर मॅनुफॅक्चरिंग युनिट्स विकण्याची योजना आहे.
Atto 3 सह, ग्राहकांना एक इंट्रोडक्टरी प्रमोशनल पॅकेज देखील मिळत आहे. यात 7kW वॉल चार्जर, 3kW पोर्टेबल चार्जिंग बॉक्स, 3 वर्षांसाठी (2GB महिना) 4G डेटा फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
यासोबतच 6 वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टंस आणि 6 लेबर कॉस्ट मेंटेनन्स फ्री दिला जाईल. असं मानलं जात आहे की, या इलेक्ट्रिक SUV ची किंमत 20 ते 25 लाखांदरम्यान असू शकते. भारतीय बाजारपेठेत या SUV ची थेट स्पर्धा MG ZS EV आणि Hyundai Kona इलेक्ट्रिक SUVs होणार आहे.
लहान – मोठ्यांसाठी जबरदस्त सेफ्टी…
BYD Atto 3 इलेक्ट्रिक कारच्या युरो NCAP दरम्यान 4 सेफ्टी टेस्ट झाल्या. यामध्ये एडल्ट ऑक्यूपेंट, चाइल्ड ऑक्यूपेंट, वल्नरबल रोड यूजर आणि सेफ्टी असिस्ट यांचा समावेश आहे. एडल्ट ऑक्यूपेंट टेस्ट दरम्यान याला एकूण 34.7 गुण किंवा 91% स्कोर मिळाला. चाइल्ड ऑक्यूपेंट टेस्ट दरम्यान 44 गुण किंवा 89% स्कोर मिळाला.
असुरक्षित रोड यूजर प्रोटेक्शन (VRU) साठी त्याला 37.5 गुण किंवा ६९% स्कोर मिळाला… तर सेफ्टी असिस्ट साठी 12.0 गुण किंवा 74% स्कोर मिळाला. अशा प्रकारे याला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले.
Heavy Rain : राज्यात पुन्हा दमदार पाऊस; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत
अनेक सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज :-
सेफ्टी BYD Atto 3 मध्ये 7 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक आणि स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, लेव्हल 2 ADAS सिस्टम, माउंटेड कंट्रोल्ससह फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग सारखी अनेक फीचर्स देण्यात आली आहे.
सिंगल चार्जवर तब्बल 521Km ची रेंज :-
BYD च्या Atto 3 इलेक्ट्रिक कारमध्ये 60.49kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, या बॅटरी पॅकमुळे ही कार 521Km ची रेंज देईल. कारमध्ये पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर वापरली गेली आहे, जी 201bhp कमाल पॉवर आणि 310Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग पकडू शकते. कंपनीचा दावा आहे की, ते 50 मिनिटांत ही बॅटरी 80% पर्यंत चार्ज होऊ शकते.
अनेक जबरदस्त फीचर्ससह सुसज्ज :-
BYD Atto 3 मध्ये 5-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते. कारला 4-वे ॲडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर हीटेड सीट, सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टम, 6-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हिल डिसेंट कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पीएम 2.5 एअर फिल्टर, सिंथेटिक लेदर सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरामिक सनरूफ यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Heavy Rain : राज्यात पुन्हा दमदार पाऊस; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत