कोविडच्या संकट काळात अनेक रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्याने सर्व रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, गेल्या दोन वर्षांत सह्याद्री एक्स्प्रेस बंद होती. वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. नुकतेच पुणे विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सह्याद्री एक्स्प्रेसबाबत निर्णय घेण्यात आला असून, रविवार (दि 5 नोव्हेंबर) पासून सह्याद्री पुन्हा जयाद्री खाऱ्यातून धावू लागली आहे.
कोल्हापूर ते मुंबईदरम्यान रात्री धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईत सकाळी अकराच्या सुमारास पोहोचत असे . सायंकाळी सहा वाजता पुन्हा कोल्हापूरकडे रवाना होत असे. ही गाडी मुंबईकडे जाण्यासाठी जेजुरी- नीरा शहरात पहाटे साडेचार – साडेपाचदरम्यान येत असे आणि मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास येत होती.
यामुळे जेजुरी शहरासह नीरा, पुरंदर, बारामती फलटण, खंडाळा तालुक्यातील शंभर गावांतील व्यावसायिक, नोकरदार यांना मुंबईला जाऊन यायला सोईची होती. दिवसभराचे काम करून पुन्हा निरेत येत होती. पण, गेल्या दोन वर्षांपासून ही गाडी बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.
आता पुन्हा सह्याद्री एक्स्प्रेस (गाडी क्र. 1023/1024) नव्या वेळेत सुरु केली आहे. पण, ती कोल्हापूर – पुणे दरम्यान धावणार असल्याने प्रवाशांनी काहीसे समाधान व्यक्त केले आहे.
असे आहे सह्याद्री एक्स्प्रेसचे वेळापत्रक..
5 नोव्हेंबरपासून सह्याद्री एक्स्प्रेस कोल्हापूर मधून रात्री 11.30 वाजता पुण्याकडे रवाना होणार आहे. मिरज 00:35 कराड 02:0, सातारा 03:57 नीरा 05:13, जेजुरी 05:48, सासवड (काळे बोराटे नगर) 6:15 तर पुण्यात 07:45 वाजता पोहोचेल.
पुण्यातून रात्री 09:45 वाजता कोल्हापूरकड रवाना होणार आहे. जेजुरीमध्ये 10:44, नीरामध्ये 11:14, सातारा 00:22, कराड 01:35 कोल्हापूरमध्ये 05:40 वाजता पोहचेल. .