MahaVitaran : शेतकऱ्यांसाठी भन्नाट योजना..! पडीक जमीन भाड्याने द्या अन् दिवसा 12 तास विजेसह मिळवा 1.50 लाखांपर्यंत भाडे, इथे अर्ज करण्याचे आवाहन..
महावितरणने शेतकऱ्यांसाठी भन्नाट योजना सुरु केली आहे. या बदल्यात शेतकऱ्यांना महावितरणकडून एकरी 30 हजार रुपये भाडे मिळणार आहेत. या योजनेमुळे शेतीपंपासाठी दिवसाही 12 तास वीज उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सौर कृषी वाहिनी योजना या नावाने शेतकऱ्यांसाठी अनोखी योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये उपकेंद्र परिघाजवळील महावितरण कंपनी भाड्याने घेणार आहे. यामध्ये किमान 3 एकर व त्यापासून पुढे कितीही जागा महावितरण कंपनीला भाड्याने देता येणार आहे.
या दिलेल्या प्लॅटमध्ये महावितरण कंपनी सोलर प्लॅट उभा करणार असून त्यापासून तयार होणारी वीज ही शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामध्ये शासनाच्या गायरान जमिनी व खासगी शेतकरीही यामध्ये सहभागी होवू शकणार आहेत.
दिलेल्या क्षेत्रासाठी एकरी 30 हजार रुपये भाडे शेतकऱ्याल दिले जाणार असून पाच एकर क्षेत्रासाठी वर्षाला दीड लाख रुपये भाडे शेतकऱ्याला मिळणार आहे. यासाठी कंपनीमार्फत वेबसाईटद्वारे प्रस्ताव नोंदणी करण्याचे काम सुरु असून पंचवीस वर्षाकरीता हे करार केले जाणार आहेत.
तसेच यामध्ये वैयक्तिकरित्या व्यावसायिक म्हणूनही यामध्ये लोक येवू शकणार आहेत. याचा वेगळा फायदाही शेतकऱ्यांना होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन केलं आहे.
कशी राबवली जाणार योजना :-
शेतकऱ्याने भाडेतत्वावर दिलेल्या जागेवर महावितरण कंपनी सोलर प्लँट उभारुन त्यापासून वीज निर्मिती करणार आहे. ही निर्माण झालेली वीज शेतकऱ्यांना दिवसा 12 तास उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 12 महिन्यातील दहा महिने ही वीज मिळणार असून केवळ दोनच महिने तेही पावसाळ्यात ती वीज शेतकऱ्यांना लागणारच नाही. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
अटी – शर्तींसह कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या फायद्यासाठीच ही योजना राबविली असून ज्यांच्या जमिनी पडीक आहेत व बागायती नाहीत, असे लोक यामध्ये सामील होणार आहेत. तसेच गायरान जमिनींचेही प्रस्ताव घेतले जाणार आहेत. गावागावात व ग्रामपंचायतींनीही याची माहिती लोकांना देवून जे इच्छुक आहेत, त्यांनी संबंधित महावितरण कंपनीत संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता विनायक इदाते व उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे यांनी केले आहे.