Shaktipeeth Expressway बाबत मोठं अपडेट! ‘या’ मूळ शक्तिपीठाला वगळल्याने भाविकांत प्रचंड नाराजी, पहा नवी रोड मॅप अलाइनमेंट..

0

देशातील अनेक शहरांमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी एक्स्प्रेस – वेवर सातत्याने काम सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून तयार होत असलेल्या एक्स्प्रेस वेमुळे वाहतूक व्यवस्थेबरोबरच पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळत आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणेच आता राज्यातील सर्वात मोठा असणारा नागपूर ते गोवा दरम्यान 805 किमी लांबीचा शक्तीपीठ एक्सप्रेस तयार केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील 12 जिल्हे जोडले जाणार आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर नागपूर ते गोवा द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा वेळ 8 तासांवर येणार आहे.

राज्यातील 3 शक्तिपीठे, 2 ज्योतिलिंग, दत्तगुरुची 5 धार्मिक स्थळे, पंढरपूरसह एकूण 19 तिर्थक्षेत्रांना जोडला जाणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग संबोधलं आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने 28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे.

परंतु त्यात राज्यातील साडे तीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ असलेल्या माहूरला वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ज्या मार्गाला ‘शक्तीपीठ’ असे नाव दिले आहे. त्याच विभागाने माहूर शक्तीपीठापासून 25 किमी दूर असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आणी तालुक्यातील तिवरंग येथून हा मार्ग वळवून थेट यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात जोडल्याने माहूर गडावरील रेणुका मातेवर श्रद्धा असणाऱ्या भाविकांमध्ये प्रचड नाराजी पसरली आहे..

महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र ‘शक्तीपीठ’ महामार्ग तयार होत आहे.

राज्यातील पवनार (जि. वर्धा) ते पात्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) महाराष्ट्र – गोवा सरहद्द जोडणाऱ्या या ‘शक्तीपीठ’ महामार्गात येणाऱ्या जिल्ह्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी या महामार्गांच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात झालेल्या बैठकीत शक्तीपीठ शीघ्रसंचार द्रुतगती महामागांचे सादरीकरणाच्या वेळी संबंधितांना दिले होते.

त्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे. मात्र या प्रकल्पांच्या मूळ हेतुला व महामार्गाला देण्यात आलेल्या नावाला.हरताळ फासला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 28 फेब्रुवारी रोजी या प्रकल्पात येणाऱ्या गावाची व संपादित करण्यात येणाऱ्या शेत सर्वे नंबरची यादी जाहीर केली आहे.

त्यात वर्धा जिल्ह्यातील येणारा हा मार्ग यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून लोहनबेळ, घोणसरामार्गे वळवून पोहडुळ, इजनी,हिवरामार्गे महागाव तालुक्यात गेला आहे.

एमएसआरडीसीने या महामार्गाचे संरेखन अर्थात महामार्ग कुठून आणि कसा जाईल यासंबंधीचा मार्ग निश्चित केला आहे. या संरेखनानुसार आता माहूर शक्तिपीठाला कट मारण्यात आला आहे.

शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या तालुकानिहाय गावांची यादी आली

इथे क्लिक करा

विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सवागीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा, असा या नूतन महामागाचा हेतू आहे. मात्र मूळ हेतु बाजूला ठेवून संबंधित विभागाने हा मार्ग माहूरपासून 25 किमी अलीकडेच वळवल्याने माहूरकरांसह भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.