शेतीशिवार टीम, 24 डिसेंबर 2021 : जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूळव्याधची समस्या उद्भवते तेव्हा त्याच्या गुदद्वाराच्या आत आणि बाहेरील त्वचा सुजते,तर कधी दुखापत सुद्धा होते.याशिवाय चामखीळ देखील दिसतात, जे फक्त स्पर्श केल्यावरच जाणवतात. ही समस्या खूप वेदनादायक असतात. अशा परिस्थितीत, या समस्येच्या काळात व्यक्तीने आपल्या आहाराची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.
ज्या लोकांना मूळव्याधची समस्या आहे, त्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडतो की त्यांनी दूधाचे सेवन करावे की नाही ? येथे आपण दुधाच्या सेवनाने रुग्णावर कसा परिणाम होतो याबद्दल जाणून घेउयात ?
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये फारच कमी फायबर असते हे लक्षात घेता, याच्या सेवनाने बद्धकोष्ठता होऊ शकते किंवा स्थिती आणखी वाईट होऊ शकते का ?
चला तर मग जाणून घेऊयात….
मूळव्याधात दूध प्यावं की ताक ?
खरं तर, मूळव्याध असलेल्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. दुग्धजन्य पदार्थांमध्ये दुधासह दुधाचे पदार्थ, चीज इ. यावर अजून संशोधन होणं बाकी असले तरी डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मुळव्याध असताना दूध प्यायल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. कारण दुधामध्ये कमी फायबर असलेले अन्न म्हणून पाहिलं जातं.
चहा किंवा कॉफी टाळा :-
याव्यतिरिक्त, आपण चहा आणि कॉफी सारख्या काही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. ही उत्पादने तुमच्या शरीराचे निर्जलीकरण करू शकतात ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. तुम्हाला मूळव्याध असल्यास, कॅफिनचे सेवन हळूहळू कमी करण्याची शिफारस केली जाते.
ताक प्यावं की नाही ?
मुळव्याध असताना दुधाऐवजी ताक प्या, खूप फायदा होतो. एक ग्लास ताक ओवा बिया आणि काळे मीठ मिसळून प्या. यामुळे मुळव्याध दुखण्याच्या समस्येपासून खूप आराम मिळतो. दुसरीकडे, याचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
मूळव्याधचं ओप्रेशन झाल्याबर दूध प्यावं कि नाही :-
मूळव्याध शस्त्रक्रियेनंतर, एखादी व्यक्ती किमान 4 तास काहीही खाऊ शकत नाही. त्यानंतर रुग्ण लिक्विड डाइटवर राहतो. त्या काळात तो केळी, साधा भात इत्यादींचे सेवन करू शकतो. शस्त्रक्रियेनंतर, एखादी व्यक्ती दूध घेऊ शकते पण दिवसातून फक्त दोनच कप दूध.
कोणती फळे आणि भाज्या खाव्यात :-
मूळव्याध असलेल्या लोकांनी बटाटे, शिमला मिरची, वांगी, आर्बी, भेंडी,जांभूळ, कच्चा आंबा, फणस इत्यादींचे सेवन करणे टाळावं किंवा मर्यादित ठेवावे. त्याच वेळी, आडू (पीच) आणि केळी देखील मूळव्याध रुग्णांना धोका देऊ शकतात.