सिंचन विहिरीस गावस्तरावर 15 जणांना 4 लाखाचे अनुदान ! ‘या’ ॲपवर अशी करा नोंदणी, पहा अर्ज Form अन् प्रस्ताव..
जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामाचा विशेष लाभ मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
ज्या सिंचनाची पर्यायी साधने उपलब्ध नाहीत त्यांना सिंचन देण्याची सरकारची योजना आहे. तेथे विहीर बांधून सिंचनाची साधने उपलब्ध करून द्यावीत. विहिरी बांधून परिसरातील पाण्याची पातळी राखली जाते. हे नैसर्गिक जल पुनर्भरण आणि कृषी अनुदान आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते खूप महत्त्वाचे आहे.
ही योजना 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाली असून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनुसार महाराष्ट्रात आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदल्या जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भागात महाराष्ट्रातील ग्रामीण मनरेगाच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. शिराळा तालुक्यामध्ये सिंचन विहिरीसाठी प्राप्त 1365 उद्दिष्टांपैकी आतापर्यंत 382 लाभार्थ्यांची ऑनलाईन ॲपमध्ये नोंद झाली आहे. तर 52 प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले असल्याची माहिती सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सचिन खबाले यांनी दिली.
खबाले म्हणाले, प्रत्येक गावात किमान 15 शेतकऱ्यांना लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. अलीकडेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आला आहे.
मनरेगांतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतीशीर वापर गेल्यास अनेक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. मनरेगामधून लाभार्थीची निवड करून ग्रामसभेची मान्यता दिल्यानंतर महिन्याभरात लाभार्थ्यांना विहीर खुदाईला मंजुरी दिली जाणार आहे.
सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज Form :- इथे क्लिक करा
सिंचन विहीर अनुदान योजना प्रस्ताव :- इथे क्लिक करा