शेतीशिवार टीम, 5 फेब्रुवारी 2022 : स्कोडा ऑटो इंडियाने (SKoda Auto India) जाहीर केलं आहे की, या वर्षासाठी नुकतीच लाँच झालेली कोडियाक फेसलिफ्ट एसयूव्ही (Kodiaq Facelift SUV) पूर्णपणे विकली गेली आहे.
कंपनीने भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी कोडियाक फेसलिफ्टचे (Kodiaq Facelift) 1,200 युनिट्स आयात केले होते, ते लॉन्चच्या अवघ्या 20 दिवसांत कंपनीने या सर्व SUV ची विक्री झाली आहे.
आता जर ग्राहकांना ही SUV घ्यायची असेल तर त्यांना यासाठी 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे, याशिवाय दुसऱ्या बॅचमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणारी ही SUV सुद्धा 1 लाख रुपयांनी महाग भेटणार आहे.
ही SUV 10 जानेवारीला झाली होती लॉन्च…
Skoda ने काही दिवसांपूर्वीच Kodiaq फेसलिफ्ट बाजारात आणली आणि कंपनीने किमती SUV च्या किमतीतही वाढ केली.10 जानेवारी रोजी लाँच झालेल्या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 34.99 लाख रुपये ठेवण्यात आली होती आणि आता कंपनीने तिच्या सर्व प्रकारांच्या किंमतीत 1 लाख रुपयांची वाढ केली आहे.
त्याची पहिली बॅच ही ग्राहकांना जबरदस्त पसंत पडल्याने दुस-या बॅचसाठी तिच्या किमती वाढवल्या आहेत. Skoda Kodiaq तीन प्रकारांमध्ये स्टाइल, स्पोर्टलाइन आणि L&K च्या नवीन किमती अनुक्रमे 35.99 लाख, 36.99 लाख आणि 38.49 लाख आहेत.

टॉप मॉडेलची किंमत आहे 38.49 लाख रुपये..
स्टाइल, स्पोर्टलाइन आणि लॉरिन अँड क्लेमेंट अशा 3 ट्रिममध्ये एसयूव्ही ऑफर केली आहे. कोडियाक फेसलिफ्टच्या (Kodiaq Facelift) टॉप मॉडेलची किंमत 38.49 लाख रुपयांपर्यंत जाते. एप्रिल 2020 मध्ये BS6 नियम लागू झाल्यानंतर, कंपनीने ही कार बंद केली होती. परंतु सुमारे दोन वर्षां नंतर येऊन या SUV ने धुमाकूळ घातला आहे. नवीन कोडियाक (Kodiaq), फॉक्सवॅगन तैगुन (Volkswagen Taigun), ह्युंदाई टक्सन (Hyundai Tucson) आणि सिट्रोएन सी5 एअरक्रॉसशी (Citroen C5 Aircross) स्पर्धा करेल..
7.8 सेकंदात 0-100 कि. मी अंतर कापणार…
Skoda ने गेल्या वर्षी जागतिक बाजारात कोडियाक फेसलिफ्ट (Kodiaq Facelift) सादर केली होती, ज्यामध्ये बाह्य, आतील आणि डिझाइनमध्ये बदल करण्यात आले होते. SUV मध्ये BS6 मानक 2.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन आहे जे 190 PS पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. कंपनीने हे इंजिन 7-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज केलं आहे आणि स्कोडा दावा केला आहे की, कोडियाक (Kodiaq) 7.8 सेकंदात 0-100 किमी / ताशी वेग वाढवू शकते.
डॅशबोर्डवर 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
केबिनबद्दल बोलायचे झाले तर SUV ला ब्लॅक आणि बेज थीम असलेले इंटीरियर देण्यात आलं आहे. इनबिल्ट नेव्हिगेशन आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. डॅशबोर्डवर 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, याशिवाय थ्री-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 12-स्पीकर साउंड सिस्टीम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
SUV च्या पुढील सीट व्हेंटिलेटेड आहेत आणि कूलिंग आणि हीटिंग फंक्शन्ससह येतात. केबिनमध्ये अँम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिक पॅनोरमिक सनरूफ यांसारखी इतर अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही SUV दमदार…
कंपनीने 2022 कोडियाक फेसलिफ्टसह (Kodiaq Facelift) डायनॅमिक चेसिस कंट्रोल सिस्टम ऑफर करण्याचे देखील सांगितले आहे. याद्वारे, SUV चे शॉक शॉक अबजॉर्वर्स डॅपिंग केरेक्टरिस्टिक्स फीचर्समध्ये आहे. युजर्स ड्रायव्हिंग मोड निवडून ते बदलू शकतात. Skoda ने या SUV मध्ये 5 ड्रायव्हिंग मोड दिले आहेत ज्यात Eco, Normal, Sports, Snow आणि Individual यांचा समावेश आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कार मजबूत आहे, ज्यामध्ये 9 एअरबॅग्ज, ESC, MCB, AFS, ABS, ASR सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. टॉप मॉडेलसह नेहमीप्रमाणे हिल डिसेंट कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे.