मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध साडेतीन पीठांपैकी एक तुळजा भवानी मंदिर असून ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. राज्यातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून वर्षभर या मंदिरात स्थानिक व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी असते.

मात्र रेल्वेची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते म्हणून सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून मागणी केलेली होती.

अखेर आज या मार्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य शासनाच्या वाट्याचे 452 कोटी 46 लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पासाठी 904 कोटी 92 लाख इतका खर्च येणार असून 50 टक्के सहभाग राज्य शासनाचा असल्याने तो मंजूर झाला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

हा रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मराठवाड्याशी सोलापूरची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करेल आणि या प्रदेशाच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देणार असून व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी यांच्या प्रवासाची सोय होणार आहे.

सध्या काय आहे, या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची स्थिती :-

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्गातील लाईन मार्कींगचे काम पूर्ण झालं असून राज्यातील भूमिअभिलेख अधिकारी व रेल्वे भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. लवकरच मोजणीचा अंतिम अहवाल भूसंपादन अधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असून त्यानंतर जमीनदारांच्या खात्यावर भूसंपादनाचा निधी जमा होणार आहे. त्यामुळे कोणाच्या हरकती नसल्यास वर्षभरात हा मार्ग तयार होणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

या 84 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी 660 हेक्‍टर जमिनीचे एकूण 42 गावातील जमिनीचे भूसंपादन होणार असून यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 30 किमीचे सोलापूर जिल्ह्यातील 122 गावांचा समावेश आहे. सोलापूर ते उस्मानाबाद दरम्यान सहा रेल्वेस्थानक सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्ग 84.44 किलोमीटर अंतराचा आहे.

या दरम्यान सहा रेल्वेस्थानक असून यामध्ये उस्मानाबाद स्थानक सोडल्यानंतर साजा, तुळजापूर, मालझा, तामलवाडी ( जि. उस्मानाबाद ), खेडव बाळे (जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.

दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी आनंदात..

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आपल्या शेतातून असल्यानं आपल्याला किती मोबदला मिळणार, किती जमीन जाणार ? या आशेने शेतकरी आनंदात आहे. त्यामुळे हा मोबदला कधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाल्याने शेतऱ्यांमध्ये चर्चा घडू लागल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *