राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरीत्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना १० ऑगस्ट आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज भरावयाचे आहेत. ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), आधारकार्ड, स्वतःचे पासपोर्ट आकारातील छायाचित्र, कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाइलद्वारे कागदपत्रांचे छायाचित्र काढून ते अपलोड करावे, विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विहित मुदतीत जमा करायची आहेत. (SSC HSC 17 No. Form)
ऑनलाइन शुल्क आणि मुदतीच्या तारखांची सविस्तर माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वतःजवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस किंवा कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही.
विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.
या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज..
दहावीसाठी 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी लिंक – http://form17.mh-ssc.ac.in
बारावीसाठी 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी लिंक – http://form17.mh-hsc.ac.in
कागदपत्रे :-
शाळा सोडल्याचा दाखला
आधारकार्ड
पासपोर्ट फोटो
परीक्षा शुल्क
मूळ कागदपत्रे
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी- दिव्यांगत्वाचे प्राधिकृत प्रमाणपत्र