PM Kisan : 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; e-KYC पूर्ण नसेल तर नाही येणार 10वा हप्ता ; जाणून घ्या Step by step प्रोसेस…
शेतीशिवार टीम, 10 डिसेंबर 2021 : Step by step instructions to finish e-KYC in PM Kisan Yojana : PM किसान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना (2021 PM Kisan Sanman Nidhi Yojana 2021) मध्ये मोठा बदल केला आहे.
तुम्ही ई-केवायसी (E-KYC) पूर्ण केल्यानंतरच तुमचा 15 डिसेंबरपर्यंत पुढील हप्त्या खात्यात जमा होणार आहे. अन्यथा तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. सरकारने या योजनेत E-KYC बंधनकारक केले आहे.
सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत रजिस्टर केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी-आधार (E-KYC-Aadhaar) अनिवार्य केलं आहे. पोर्टलवर आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरणासाठी (Authentication) किसान कॉर्नरमधील E-KYC ऑप्शनवर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी (Authentication) जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसं, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे (Step by step ) साध्य करू शकता…
यासाठी सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या पोर्टलवर जा…
उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला E-KYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा
आता तुमचा आधार क्रमांक (Aadhaar number) आणि इमेज कोड (Image code) टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका.
जर सर्व काही ठीक झाले असेल तर E-KYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल…
Invalid आल्यास तुमचा हप्ता उशीर येऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर (Aadhaar Service Center) दुरुस्त करून घेऊ शकता.
यांना नाही मिळणार हप्ता…
कुटुंबात जर कोणी करदाता असेल तर.
जे लोक शेतीच्या कामाऐवजी इतर कामासाठी शेतजमीन वापरत आहेत.
बरेच शेतकरी इतरांच्या शेतात शेतीची कामे करतात, परंतु शेताचे मालक नाहीत.
शेतकरी शेती करत असेल, पण शेत त्याच्या नावावर नाही
शेत त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर
जर कोणाच्या मालकीची शेतजमीन असेल पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त झाला असेल
आजी – माजी आमदार, खासदार, मंत्री
व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीय
एखाद्या व्यक्तीकडे शेत आहे, परंतु त्याला महिन्याला 10000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते.