Take a fresh look at your lifestyle.

‘या’ 6 आजारांनी ग्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका आवळा ; मधुमेहींनी तर जरूर वाचावं !

0

शेतीशिवार टीम, 10 डिसेंबर 2021 : हिवाळ्यात आवळ्याचं सेवन करणे खुपचं फायदेशीर मानलं जातं.आवळा हा व्हिटॅमिन सी (Vitamin C)ने समृद्ध असण्याबरोबरच अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स घटकही त्यामध्ये आढळतात. म्हणूनच याला हिवाळ्यातील सुपरफूड असंही म्हणतात.

आवळ्यातील पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. अन्नाबरोबरच अनेक प्रकारच्या औषधांमध्येही याचा वापर केला जातो. परंतु आवळ्याचं सेवन सर्वांसाठीचं फायदेशीर ठरतं असं नाही, काही विशिष्ट आरोग्यस्थिती असलेल्या लोकांना आवळ्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात.

तर जाणून घेऊया आवळ्याचं सेवन कोणी करावं कोणी करू नये !

अ‍ॅसिडिटीने ग्रस्त असलेले लोक :-

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी(Vitamins C) भरपूर प्रमाणात आढळतात. हे एक पोषक तत्व आहे जे फळाची आम्लता वाढवण्याचे काम करतं .अभ्यासानुसार, आवळा हे छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करते, परंतु ते हायपर ऍसिडिटी असलेल्या लोकांमध्ये समस्या वाढवू शकते. हायपर ऍसिडिटी असलेलया लोकांनीचुकून सुद्धा रिकाम्या पोटी सेवन करू नये. यामुळे पोटात तीव्र जळजळ आणि ऍसिडिटी होऊ शकते.

रक्ताचा आजार असलेले लोक :-

आवळ्यामध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म असतात. याचा अर्थ ते रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करू शकतात. आवळ्याच्या या गुणधर्मामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack) आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो, परंतु ज्यांना आधीच कोणत्याही प्रकारच्या रक्त विकाराने (Blood disorders)
ग्रासले आहे त्यांच्यासाठी आवळा हा चांगला पर्याय नाही.अशा लोकांनी डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतरच आवळ्याचं सेवन करावं.

शस्त्रक्रिया (Surgery) करणाऱ्या लोकांसाठी :-

ज्यांना लवकरच एखाद्या गोष्टीसाठी सर्जरी करावी लागणार आहे, त्यांनी सध्या आवळा खाणे टाळावे. या फळाचे जास्त सेवन केल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.प्रदीर्घ रक्तस्रावामुळे हायपोक्सिमिया, गंभीर ऍसिडोसिस किंवा मल्टीऑर्गन डिसफंक्शन होऊ शकते. त्यामुळे सर्जरीच्या किमान 2 आठवडे आधी आवळा खाणे बंद करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कमी ब्लड शुगर लेव्हल असलेल्या लोकांनी :-

आवळा ब्लड शुगर लेव्हल कमी करतो. टाइप-1 आणि टाइप -2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर तर आहे, परंतु ज्या लोकांच्या ब्लड शुगर लेव्हल प्रमाणापेक्षा कमी असते त्यांच्यासाठी आवळा खाणं चांगलं नाही. किंवा जे लोक एंटी-डायबिटिक औषध घेत आहेत त्यांनी…

गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी :-

आवळ्यामध्ये असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. यामुळे डायरिया आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ही लक्षणे अधिक गंभीर असू शकतात. या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आवळा खावा.

ड्राई स्कॅल्प किंवा ड्राय स्किन असलेले लोक :-

जर तुमची ड्राई स्कॅल्प असेल किंवा तुमची ड्राय स्किन असेल तर आवळा जास्त खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते. यामुळे केस गळणे, खाज येणे, कोंडा होणे आणि केसांशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. आवळ्यातील काही घटक डिहायड्रेशन वाढवतात. त्यामुळे आवळा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.