Take a fresh look at your lifestyle.

Gold rate today : ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर…

0

शेतीशिवार टीम,10 डिसेंबर 2021:-आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरातील सोन्या-चांदीच्या दरात तफावत चालू आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे रेट आज देत आहोत. या बातमीत 22ct (22 कॅरेट) आणि 24ct (24 कॅरेट) सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली जात आहे. एमसीएक्स (MCX)आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे रेट टॅक्स नसलेले आहेत, त्यामुळे देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत असेल.

कालपासून आजपर्यंत सोन्या-चांदीचे दर किती बदलले ते जाणून घ्या :-


इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा रेट 47,836 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याच वेळी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 47,968 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​स्टॉप झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा रेट 132 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडकिस आला आहे.तरी,यानंतरही, सोने आजही 8,364 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.त्याच वेळी,आज चांदीचा दर 60,094 रुपये प्रति किलोवर उघडला आहे. मागच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 60,988 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा रेट प्रतिकिलो 894 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे.

सकाळी (MCX) वर सोन्याचा व्यवहार कोणत्या रेटने होतो ते जाणून घ्या:-


मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने घसरणीसह व्यवहार करत आहे. सोन्यामध्ये फेब्रुवारी 2022 चा फ्युचर्स ट्रेड 49.00 रुपयांच्या घसरणीसह 48,890.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदीचा मार्च 2022 फ्युचर्स ट्रेड 326.00 रुपयांच्या घसरणीसह 60,472.00 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी-विक्री कोणत्या दराने होत आहे :-


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण सुरूच आहे.यूएस (US) मध्ये, सोने $ 3.49 कमी होऊन $ 1,772.76 प्रति औंस रेटने व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी $0.10 च्या घसरणीसह $21.89 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.

सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाणून घ्या:-

दिल्लीमध्ये आजचे सोन्या-चांदीचे दर:-

सोने 22ct :रु. 47110,
सोने 24ct :रु. 51400,
चांदीची किंमत: रु. 60700 .

हैदराबादमध्ये आजचे सोन्या-चांदीचे दर:-

सोने 22ct : रु. 44960,
सोने 24ct : रु. 49050,
चांदीची किंमत: रु. 64800.

मुंबईमध्ये आजचे सोन्या-चांदीचे दर:-

सोने 22ct : रु. 46850,
सोने 24ct : रु. 47850,
चांदीची किंमत: रु.60700.

नागपुरामध्ये आजचे सोन्या-चांदीचे दर:-

सोने 22ct : रु. 46850,
सोने 24ct : रु. 47850,
चांदीची किंमत: रु.60700.

नाशिकमध्ये आजचे सोन्या-चांदीचे दर:-

सोने 22ct : रु. 46290,
सोने 24ct: रु. 49560,
चांदीची किंमत: रु. 60700.

पुण्यामध्ये आजचे सोन्या-चांदीचे दर

सोने 22ct : रु. 46290,
सोने 24ct : रु. 49560,
चांदीची किंमत: रु.60700.

सुरतमध्ये आजचे सोन्या-चांदीचे दर:-

सोने 22ct : रु. 45890,
सोने 24ct: रु. 49080,
चांदीची किंमत: रु.60700.

विजयवाड्यातील आजचे सोन्या-चांदीचे दर:-

सोने 22ct : रु. 44960,
सोने 24ct : रु. 49050,
चांदीची किंमत: रु.64800.

Leave A Reply

Your email address will not be published.