शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. तसेच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी आहे. यासाठी स्थानिक, स्वदेशी, गावरान, सेंद्रिय पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना कृषी विभागातर्फे राबविली जात आहे.
यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रकल्पाच्या 35 टक्के तसेच कमाल तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धीसाठी या योजनेतून संबंधित जिल्ह्याच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यावर आधारीत कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक सामाईक पायाभूत सुविधा इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटिंग व ब्रण्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थसहाय्य देण्यात येते.
वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा कमाल 10 लाख तर सामाईक पायाभूत सुविधा इन्क्यूबेशन केंद्र, मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा कमाल 3 कोटी रूपयांचे अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.
यासाठी उद्योजक, शेतकरी, बरोजगार युवक महिला, भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट सहकारी, शासकीय संस्था यांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनाजकुमार द्वरा यांनी केले आहे.
व्याजदरात मिळणार तीन टक्के सवलत..
यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे, बँकेकडे सादर करणे, याबाबतच्या नोंदणीसाठी कृषी विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत हाताळणी सहाय्य केले जात आहे. आत्मातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.
PMFME योजनेअंतर्गत कसा कराल अर्ज ?
अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने प्रथम प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न उद्योग अपग्रेडेशन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे
लिंक – https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page
वर दिलेल्या लिंकवर क्लिक करताच या योजनेच्या अधिकृत वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेचे लाभ, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया (पीएम सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नती योजना) येथे तुम्हाला ऑनलाइन नोंदणीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. लिंक – pmfme.mofpi.gov.in
तुम्ही क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर पुढील पेज उघडेल जिथे तुम्हाला Sign up चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला विनंती केलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून टाकावी लागेल.
विनंती केलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर, तुम्हाला नोंदणी बटणावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही मायक्रो फूड इंडस्ट्री अपग्रेडेशन स्कीम 2023 च्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर याल..
येथे तुम्हाला Select beneficial type चा पर्याय निवडावा लागेल.
असे केल्यावर तुमच्या समोर यासारखे एक पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला Apply Now बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक अर्ज उघडलेला दिसेल, त्यात विचारलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्जामध्ये विचारलेली माहिती आणि कागदपत्रे अपडेट केल्यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे, काही सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग अपग्रेडेशन स्कीम 2023 अंतर्गत सहजपणे नोंदणी करू शकाल.