Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता ! उसाचं एकरी 60 टन मिळणारं उत्पन्न पोहचलं 95 टनावर, पहा शेतकरी शीतल घुमट – पाटलांनी 35% उत्पन्न कसं वाढवलं ?

0

सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील नांद्रे या गावात ऊसपिकाचे उत्पादन एकरी 30 टनाने वाढले आहे. प्रगतशील शेतकरी शीतल घुमट – पाटील यांनी ही किमया केली आहे. मागील वर्षी त्यांच्या ऊस क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रामध्ये ऊस पिकासाठी ऑरबीट कन्सल्टींग घेऊन त्यांच्या मेहनती सोबतच ऑरबिटच्या उत्पादनांनी एकरी 95 टन इतके उत्पन्न घेतले आहे.

शीतल पाटील यांना सरासरी 60 ते 65 टन एकरी उत्पन्न मिळत होते. ऑरबिटची उत्पादने व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यामुळे यावर्षी त्यांच्या ऊस उत्पादनामध्ये 30 टनाने वाढ होऊन त्यांना एकरी 95 टन उतारा मिळाला आहे. यासाठी त्यांना ऑरबिटचे विनोद मादेकर, महेश शिवपुजे व शेतकरी कृषी सेवा केंद्र नांद्रेचे अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

पाटील यांनी आपल्या शेतामध्ये सप्टेंबर 2021 ला को 86032 या उसाच्या वाणाची लागण केली होती. त्यामध्ये त्यांनी मादेकर व कन्सल्टंट महेश शिवपुजे यांचे मार्गदर्शन घेतले.

उत्पादने वापरल्यामुळे जमिनीचा पोत सुधारून उसाच्या पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ झाली. फुटव्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यास चांगली मदत झाली . ऑरबिटच्या उत्पादनामुळे उसाच्या कांड्यांची संख्या 38 ते 42 पर्यंत एवढी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.