Take a fresh look at your lifestyle.

SuperHit SIP : फक्त व्याजावरचं तुम्ही व्हाल 1 कोटी 30 लाखांचे मालक, दरमहा करावी लागले ‘इतक्या’ रुपयांची SIP, पहा कॅल्क्युलेशन..

0

तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर म्युच्युअल फंडसारखी दुसरी कोणती स्कीम नाही.. हे म्युच्युअल फंडांचे परतावेचं सांगतात.ज्यामध्ये तुम्ही दीर्घ मुदतीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ मुदतीत 12 ते 15% वार्षिक परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे मोठा निधी बनवला जाऊ शकतो. जर तुम्ही 15 वर्षांचा कालावधी घेतला आणि 2 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवलं, तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही समजू शकता की हा निधी कसा तयार होईल आणि किती महिन्यांत गुंतवणूक करावी लागेल..

SIP कॅल्क्युलेटर : 2 कोटी रुपये कसे मिळवायचे ?

SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने, 15 वर्षांत 2 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल ते समजून घ्या. 2 कोटींचे टार्गेट घेऊ आणि 15 वर्षात टार्गेट पूर्ण करायचं असेल तर दर महिन्याला 40,000 रुपये गुंतवावे लागतील. यावर अंदाजे 12% परतावा लागू केल्यास, तुम्हाला त्या कालावधीत रु. 2,01,83,040 मिळतील. या दरम्यान तुमची गुंतवणूक 72 लाख रुपयांची झाली असेल.

किती वाढेल तुमची संपत्ती ?

तुम्ही 15 वर्षांसाठी SIP द्वारे दर महिन्याला 40,000 रुपये गुंतवले आणि 15 वर्षात तुमच्या संपत्तीत सुमारे 1.29 कोटी रुपयांची वाढ झाली. या संपूर्ण कालावधीत गुंतवणूक 72 लाख रुपये असेल. परंतु,लक्षात ठेवा की हा अंदाजे परतावा गृहीत धरला आहे, बाजारातील चढउतार म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात.

वयाच्या 40 व्या वर्षीचं तुम्ही करोडपती व्हाल..

म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण, SIP च्या मदतीने तुम्हाला दीर्घ मुदतीचा परतावा मिळतो. समजा वयाच्या 25 व्या वर्षी तुम्ही 40,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही 2 कोटींचे मालक असाल..

Systematic पद्धतीने करा गुंतवणूक..

तुम्ही SIP कॅल्क्युलेटरवरून अंदाज लावू शकता की, या Systematic पद्धतीने गुंतवणूक करताना तुम्हाला थेट बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. तसेच, परतावा देखील पारंपारिक उत्पादनापेक्षा जास्त आहे. मात्र, यामध्येही धोका आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने आपले उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहून गुंतवणूक ठरवावी..

Leave A Reply

Your email address will not be published.