Auto Expo 2023 : मारुतीकडून नव्या EVX कारचे अनावरण, फुल चार्जवर मिळणार 500Km ड्रायव्हिंग रेंज, पहा व्हिडीओ..
वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2023 सुरू होताच आपली नवीन इलेक्ट्रिक SUV कॉन्सेप्ट Maruti Suzuki EVX सादर केली आहे. ही कार कंपनीने इलेक्ट्रिक SUV प्लॅटफॉर्मवर तयार केली असून जी ग्राहकांना एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देण्याचा दावा केला आहे. यावर्षी मारुती सुझुकी ग्रीन मोबिलिटी आणि इनोव्हेशन या थीम अंतर्गत ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपल्या नवीन कारचे प्रदर्शन करणार आहे.
EVX चे डिजाइन..
EVX च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर पुढची बाजू पूर्णपणे पॅक आहे. कारण ही एक इलेक्ट्रिक कार आहे, यात कोणतीही ग्रील देण्यात आलेली नाही. कारमध्ये डायमंड कट मशीन केलेले अलॉयज दिले गेले आहेत, जे खूपच आकर्षक दिसतात. असं मानलं जातंय की, व्हील 17 ते 18 इंच असू शकते. तसेच फ्रंट स्ट्रेट DRL दिले गेले आहे. समोरच्या बंपरखाली काही एलईडी देखील निश्चित केले आहेत. मागील बाजूस एक लांब एलईडी प्लेट उपलब्ध आहे. यात इंडिकेटर लाईट देखील आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बूट स्पेस मिळेल.
कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV eVX चे स्पेसिफिकेशन..
कॉन्सेप्ट SUV ची लांबी 4,300 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची 1,600 मिमी आहे. हे न्यू EV डेडिकेटेड प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. हे सेफ बॅटरी टेक्नॉलॉजीसह 60kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे आणि 550 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज आहे.
eVX ही कॉन्सेप्ट ट्रेडिशनल SUV पेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते. eVX चे अपराइट पोस्चर, हॉरिजॉन्टल हुड, हाय सीटिंग कमांडिंग, बिग केबिन आकार, लांब व्हीलबेस, मोठे व्हीलबेस, हाय ग्राउंड क्लीयरन्स आणि सिग्नेचर एलईडी लाईट एलिमेंट्स हे सुझुकीच्या SUV हेरिटेजचे प्रमुख डिझाइन एलिमेंट्स आहेत.
Maruti first concept EV showcased in #AutoExpo2023 pic.twitter.com/W1ZonYD43R
— Alok Kumar (@alocksone) January 11, 2023
याशिवाय मारुती सुझुकीने वॅगनआर फ्लेक्स फ्युएलचे प्रोटोटाइप, ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड आणि ब्रेझा एस – सीएनजी यांसारख्या इतर वाहनांची रेंज देखील प्रदर्शित केली आहे. वॅगनआर फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइपमध्ये येत आहे, फ्लेक्स इंधन पर्यायाने भरलेली कार E85 इंधनावर चालेल.
Brezza S-CNG..
मारुती सुझुकीने त्याच्या आगामी मारुती ब्रेझाचे एस सीएनजी मॉडेल ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित केलं आहे. मारुती सुझुकीकडे 14 फॅक्टरी फिट CNG वाहनांची सर्वात मोठी श्रेणी आहे.
ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड..
कंपनी आता इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड सिस्टम आणि ई – सीव्हीटी ट्रान्समिशनसह ग्रँड विटारा आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 27.97 किमी मायलेज देईल.
मारुती सुझुकीचा दावा आहे की नवीन एसयूव्ही केवळ कामगिरीच नाही तर एडवांस्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देईल. लोकांच्या माहितीसाठी, मारुती – सुझुकी कंपनीचे हे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही उत्पादनासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.