Surat – Chennai Expressway : सोलापूर जिल्ह्यातील 58 गावांतील जमिनीचे अंतिम दर निश्चित, जमीनदारांना असा मिळणार मोबदला..
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने 23 नवीन महामार्गांसाठी एक टाइमलाइन सेट केली आहे, ज्यामध्ये एक्सप्रेसवे आणि आर्थिक कॉरिडॉरचे नेटवर्क समाविष्ट आहे. ते मार्च 2027 पर्यंत तयार करण्याचं टार्गेट आहे.
यामध्ये दिल्ली – मुंबई एक्सप्रेस – वे चा पहिला टप्पा दिल्ली ते जयपुर पर्यंत सुरु करण्यात आला असून काम संपूर्ण रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर राज्यातुन जाणार सुरत – चेन्नई एक्सप्रेस वेच्या भूसंपादनाचे काम सुरु असून आता नाशिक – अहमदनगर – बीड – सोलापूर जिल्ह्यांतील जमिनींच्या प्रतवारीनुसार दर निश्चिती केली जात आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात भूसंपादन जोमाने सुरु असून 58 गावांतील जमिनीचे दर निश्चित झाले आहे. जमिनी ताब्यात घेण्यासाठी मालकी हक्काचे प्रस्ताव मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने नोटीसा बजाविल्या आहेत. परंतु महामार्गात जाणाऱ्या जमिनींच्या मोबादल्यावरुन शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून समज – गैरसमज पसरले आहे.
प्रशासनाने शासन नियमानुसार कटाक्षाने पाहणी करुनच जमिनींचे अंतिम दर अंतिम निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील 58 गावांतील प्रत्येक जमिनींचे दर वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे गावांनुसार सर्व दर बाजारभावाचा विचार करुनच कमी – अधिक ठरवले गेले आहे. तसेच जमिनींचे दर निश्चित करताना शेतकऱ्यांची बांधकामे, फळबागांची झाडे, विहीरी, बोअरवेल्स यांचेही मुल्यांकन करण्यात आलेलं आहे.
90% टक्के जमिनींसाठी अधिकचा दर निश्चित..
या महामार्गाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या 90% जमिनींना गुणांक दोन लागला आहे. अक्कलकोट, वैराग, मैंदर्गी, दुधनी अशा हायवेच्या कडील जमिनींना अधिकचा (चारपट) दर मिळाला आहे.
प्रत्येक गटाचे दर ठरविताना पीकपाण्याची वर्गवारी आणि जमिनींची प्रतवारी याचा विचार करण्यात आला आहे. जिरायत क्षेत्र, बागायत क्षेत्र किती ? याचाही अभ्यास करण्यात आलेला आहे.
भूसंपादनाच्या 2013 मधील नवीन कायद्यानुसार शहरी भागासाठी गुणांक 1 आणि ग्रामीण भागासाठी गुणांक 2 लागू करण्यात आला आहे. यात कुठेही खासगी वाटाघाटी पध्दतीने जमिनींचे संपादन होणार नसल्याचे सांगण्यात येते.
बाजारभावाच्या 2 आणि चारपट मोबदला..
हायवेच्या शेजारील आणि NA झालेल्या जमिनींना रेडीरेकनरच्या गुणांक एक तर इतरील जमिनींना गुणांक दोन याप्रमाणे म्हणजे अनुक्रमे बाजारभावाच्या 2 पट आणि 4 पट मोबदला प्रतिहेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात 153 किलोमीटर लांबी..
सुरत – चेन्नई हा 6 लेन राष्ट्रीय ग्रीनफिल्ड एक्सप्रेस 1289 किलोमीटर लांबीचा असून सोलापूर जिल्ह्यात हे अंतर 153.33 किलोमीटर आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या चार तालुक्यांतील एकूण 58 गावांमधून हा मार्ग जात आहे. 153 कि.मी. मध्ये 70 किलोमीटर ग्रीनफिल्ड, 60 किलोमीटर रिंगरोड आणि 23 किलोमीटर ट्रम्पेटचे असणार आहेत.