Take a fresh look at your lifestyle.

अरे व्वा ! 120Km रेंजवाली EV स्कूटर लॉन्च, सीटखाली तब्बल 43 लीटर जागा; 3 सेकंदात पकडणार 40Kmph वेग, किंमत फक्त..

0

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता, River इलेक्ट्रिकने बुधवारी भारतात आपली इंडी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली, ज्याची किंमत ₹1.25 लाख आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर असामान्य डिझाइनसह येते, जी पहिल्याच नजरेत ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. या स्कूटरसाठी बुकिंग आधीच सुरू झालं आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बाईक बुक करू शकतात. या स्टार्टअप कंपनीला 2025 पर्यंत या नवीन हाय – स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे एक लाख युनिट्स विकण्याचे टार्गेट आहे.

डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर, बाजारात उपलब्ध असलेल्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत रिव्हर इंडीला एक विशेष फ्रंट फॅसिआ डिझाइन मिळते. यात इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह ड्युअल फ्रंट एलईडी हेडलॅम्प मिळतात. यात पूर्णपणे डिजिटल 6 – इंच कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बिग साईझ 20 -इंच फूटबोर्ड आणि एलईडी टेललाइट्स देखील मिळतात.

यासोबत तुम्हाला 14 इंच ब्लॅक अलॉय व्हील पाहायला मिळतात. फ्रंट व्हीलला 240mm डिस्क ब्रेक मिळतो, तर बॅक व्हीलला 200mm डिस्क मिळते. सस्पेंशनसाठी, स्कूटरला फ्रंट साईडला टेलिस्कोपिक सेटअप आणि बॅक साईडला ट्विन हायड्रोलिक सिस्टम देण्यात आलं आहे.

15 अंशात करू शकता क्रूझ

या स्कूटरची सीटची उंची 770mm आहे आणि 14 – इंच व्हील दिसत आहेत, ज्यामुळे ती Yamaha Aerox आणि Aprilia SR160 सारखी आहे. कंपनीने या स्कूटरसाठी 18 डिग्रीच्या ग्रेडेबिलिटीचा दावा केला आहे, जो Ola S1 Pro पेक्षा जास्त आहे. हे 15 अंशांच्या कलतेवर क्रूझ करू शकते.

43-लिटरचा अंडर – सीट बूट स्पेस

EV स्टार्टअपचा दावा आहे की, रिव्हर इंडीमध्ये 12 – लिटर ग्लोव्ह बॉक्ससह 43-लिटर अंडर – सीट बूट स्पेस आहे. यामध्ये पॅनियर माउंट आणि बॅग हुक दोन्ही बाजूंना दिसतात. पार्क असिस्ट, ड्युअल यूएसबी पोर्ट यासारखे अनेक उत्तम फीचर्स स्कूटरमध्ये देण्यात आले आहे.

पावरट्रेन :-

रिव्हर इंडीला IP67 – रेट केलेल्या 4kWh बॅटरी पॅकमधून पॉवर मिळते. यात 6.7kWh इलेक्ट्रिक मोटर मिळते, जी 26Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

स्पीड :-

ही ईव्ही ताशी 90 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 3.2 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

रेंज :-

स्कूटरला एका चार्जवर 120 किमीची रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 5 वर्षे / 50,000 किमीच्या वॉरंटीसह येते.

Leave A Reply

Your email address will not be published.