आज रोजी महाराष्ट्रात अनेक महामार्गांची कामे चालू आहेत तर अनेक कामे प्रस्तावित आहेत, अश्यातलाच एक महामार्ग म्हणजे सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग. या महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकरी राजी होत असले तरी त्यांच्या मनात अनेक प्रश्न घर करून आहेत, या सर्व प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळायला हवे. यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या व त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करा असे आदेश यंत्रणेला दिले आहेत.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सूरत – चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पाची आढावा बैठक घेण्यात आली. सुरतहून चेन्नई दरम्यान साकारण्यात येणारा हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर या सहा तालुक्यामधून जातो. जिल्ह्यात हा महामार्ग 122 किलोमीटरचा असून यासाठी जिल्ह्यात 550 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे.

चार तालुक्यांमध्ये संपादीत करावयाच्या क्षेत्राचे थ्री डी मॅपिंग पुर्ण झाले असले तरी सुरगाणा आणि पेठ या दोन तालुक्यांची थ्री डी मॅपिंग संबंधित काम रखडले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. पर्यावरणाची मोठी हानी होण्याच्या शक्यतेमुळे केंद्राच्या ई एस सी समितीने सुरगाणा आणि पेठ या दोन तालुक्यामध्ये परवानगी नाकारली आहे.

केंद्राच्या ई एस सी समिती नकार मिळत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी या बैठकीच्या निमित्ताने डॉ. पवार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. संबंधित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल असे डॉ. पवार यानी स्पष्ट केले.

जमीनदार शेतकऱ्यांवर अन्याय :-

नाशिकलगत असलेल्या जमिनी तसेच शेतकऱ्यांच्या बागायती जमीनींनाही जिरायती जमिनींचाच दर दिला जात असल्याचं शेतकऱ्यांवर पाण्यात होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनाही आक्रमक पवित्र घेतला आहे. तसेच आमच्या जमिनी देऊन त्यावर आम्हालाच एंट्री नसल्याने सर्व्हिस रोड झालाच पाहिजे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Surat-Chennai Highway : अहमदनगरमधील ‘या’ 47 गावांतील शेतकरी होणार मालामाल; ‘या’ महिन्यापर्यंत 800 कोटी होणार खात्यावर जमा..

काय आहेत, शेतकऱ्यांच्या सूचना :-

भूमिसंपादनापूर्वी शेतकऱ्यांनी काही अति व शर्ती ठेवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्याची नेमकी किती जमीन जाणार व किती मोबदला मिळणार ते सांगण्यात यावे?

समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला मिळावा, महामार्गामुळे रस्ता बंद होत असल्याने सर्व्हिसरोडची सुविधा व्हावी, प्रकल्पात जाणाऱ्या पाईपलाईनचाही मोबदला मिळावा, थ्रीडी मॅपची नोटीस पाहायला मिळावी..

शेतकऱ्याकडे जे एक दोन गुंठे क्षेत्र शिल्लक राहाते त्याचा देखील मोबदला मिळावा.

बागायती जमिनी असूनही त्या कोरडवाहू दाखविल्या जात आहेत यात बदल करण्यात यावा, शहरालगतच्या ढकांबे, वरवंडीच्या जमिनींनाही जिरायतीचा दर मिळत असल्याने याला देखील स्थानिक शेतकरी विरोध करत आहेत.

या सर्व बाबींचे अचूक मुल्यांकन होऊन सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

नाशिकसह अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून हा महामार्ग जात आहे यातील तालुके कोणते ते पाहुयात :-

अहमदनगर

संगमनेर तालुका :- 13 गावे
राहता तालुका :- 5 गावे
राहुरी तालुका :- 19 गावे
नगर तालुका :- 10 गावे
जामखेड तालुका :- 13 गावे

नाशिक-अहमदनगर-बीड-धाराशिव-सोलापूरातील ‘या’ गावांतून जाणार ‘हा’ महामार्ग ; पहा, गट नंबर अन् शेतकऱ्यांची नावे

बीड

आष्टी तालुका :- 20 गावे

सोलापूर

अक्कलकोट तालुका :- 3 गावे
बार्शी तालुका :- 5 गावे
दक्षिण सोलापूर :- 4 गावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *