देशभरात अनेक राष्ट्रीय महामार्गांची कामे चालू आहेत. त्यातीलच एक गुजरात व आंध्र प्रदेश या महत्त्वाच्या दोन राज्यांना जोडला जाणारा सुरत -चेन्नई राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांमधून या मार्गाचे मार्गक्रमण होणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 47 गावातील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळणार आहे.

सुरतहून नाशिक मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चौरकौठे गावापासून सुरत- चेन्नई राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, राहता, व नगर तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.

या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी राहुरी तालुक्यातील 5 गावे सोडून इतर तालुक्यातील गटांची मोजणी पूर्ण झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे नगर जिल्ह्यातील अंतर तब्बल 100 Km असणार आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी या राष्ट्रीय महामार्गासाठी अधिसूचना जारी झाली असून पुढील 5 महिन्यांत 850 हेक्टर क्षेत्र भूसंपादित होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 800 कोटींचा मोबदला जमा होणार आहे.

42 गावांतील जमिनींच्या क्षेत्राची मोजणी झाली पूर्ण

सुरत चेन्नई महामार्गाचे अहमदनगर जिल्ह्यातील 100 किलोमीटरचे अंतर असून यामध्ये संगमनेर, राहाता, राहुरी, नगर, कर्जत तालुक्यातील 47 गावांचा समावेश आहे. यामध्ये संगमनेर – 13, राहाता – 5, राहुरी -19, नगर – 10 अशा एकूण 42 गावांच्या क्षेत्राची भूसंपादनासाठीची मोजणी पूर्ण झाली आहे.

किती अन् कसा मिळणार मोबदला ?

सध्या या बहूचर्चित महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून राहुरी तालुक्यातील पाच गावांतील जमिनीची मोजणी अद्याप बाकी आहे. या 5 गावांत राहती घरे, बागायती जमिनी जाणार असल्याने, शेतकऱ्यांनी जास्तीचा मोबदला मिळावा यासाठी तीव्र विरोध केला आहे. परंतु त्या – त्या गावातील रेडी
सरसकट रेकनर दराच्या 4 पट मोबदला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highway Authority of India) या हायवेची 3D अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

त्यानंतर महसूल प्रशासनाचे प्रांताधिकारी जमिनीचे निवाडे करतील. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्याने त्यानंतर दर निश्चित होऊन शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल. त्यानंतरच ते क्षेत्र ताब्यात घेऊन कामाला सुरुवात करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमहाप्रबंधक प्रफुल्ल दिवाण यांनी सांगितले.

ही प्रक्रिया येत्या काही महिन्यांत पार पडणार असून अजून 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या सुरत- चेन्नई महामार्गाच्या कामालाही गती मिळणार असून प्रत्यक्ष बांधकामाला 2023 पासून सुरुवात होणार आहे.

या महामार्गाबद्दल थोडक्यात माहिती :-

हा महामार्ग 6 पदरी नियोजित असून याची रुंदी 70 मीटर असणार आहे, मात्र महामार्गाची जमीन अधिग्रहण हे 100 मीटर साठी होणार आहे.

साधारणपणे डिसेंबर 2025 पर्यंत या रस्त्याचं बांधकाम पूर्ण करण्याचं शासनाचं टार्गेट आहे. यातील सुरत – नाशिक – अहमदनगर

रस्ता बांधून पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. यातील सुरत – नाशिक – अहमदनगर या 290.70 किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPR तयार करण्यात आला आहे.

गावांची यादी पहा :-

हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरपासून थेट चिंचोली गुरव, तळेगाव, वडझरी, कासारे, लोहारे, गोगलगाव, सदतपूर, हसनपूर, सोनगाव राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे – खडांबे, वांबोरी मांजरसुब्बा पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून बरदरी, सोनेवाडी, पारेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, चिंचोडी पाटील, आठवड मधून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नांदुर, वाघळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी, वाळुंज या गावातून पुढे जामखेड तालुक्यात प्रवेश करेल.

पुढे जामखेड तालुक्यातून डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, ददसलेवाडी,खांडवी, फक्राबाद, बावी, राजेवाडी,नान्नज,वंजारवाडी, पोटेवाडी, चोभेवाडी मार्गे हा महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात प्रवेश करणार…

अहमदनगर – बीड जिल्ह्यातील गावांची नावे पाहण्यासाठी  :- इथे क्लिक करा

सोलापूर जिल्ह्यातील जमीनदार मालकांची नावे पाहण्यासाठी  :- इथे क्लिक करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीनदार मालकांची नावे पाहण्यासाठी  :- इथे क्लिक करा

या संबंधातील नोटिफिकेशन तुम्ही egazette.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

अधिक माहितीसाठी surat chennai greenfield expressway ahmednagar route लिंकवर क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *