राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने ही खुशखबर दिली आहे.लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने MPSC मार्फत निर्णय घेतला होता.

त्यास आता राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील 4,122 तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार 15 दिवसात राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती राज्य शासनाला पाठविण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातारवण आहे.

31 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होणारी 1012 पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे, असे एकूण 4122 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी 29 नोव्हेंबरला स्वतंत्र पत्रक काढून तलाठी संवर्गातील या रिक्त पदांच्या भरतीसाठी आदेश दिले आहेत.

तसेच जानेवारीत जाहीरात काढून राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी आयोगाद्वारे योग्य ती प्रक्रिया केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याचे स्पष्ट आदेशही दिले आहेत.

कोणत्या विभागात किती भरणार पदे ?

कोकण – 731
नागपूर – 580
अमरावती – 183
पुणे – 746
नाशिक – 1035
औरंगाबाद – 874

नाशिकमध्ये सार्वधिक 1035 तर अमरावती विभागात सर्वात कमी 183 जागा भरण्यात येणार आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये प्रशासनाला याबाबतची सर्व माहिती देणे बंधनकारक आहे. सर्वच माहिती विहीत नमुन्यात व विवरण पत्रात भरुन जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन 15 दिवसांत सादर करण्याचे आदेशही राज्य शासनाने दिले आहे. त्यामुळे आता सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांना वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले आहे.

महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांचे पदे रिक्त आहेत. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही पदे भरल्यास शासनाचे काम तर गतीमान होईलच मात्र शेतकरी तसेच नागरिकांचे प्रश्नही यामुळे सुटणार आहेत. या निर्णयाचे आता सर्वच स्तरातून विशेषतः विद्यार्थी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.

तलाठी भरतीमधील रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तलाठी भरतीचा अभ्यासक्रम याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
एकूण पदे : 4122

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

काय आहे वयोमर्यादा :

सर्वसाधारण प्रवर्ग: 19 ते 38
मागास प्रवर्ग: 19 ते 43
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

किती मिळेल पगार ?

तलाठ्यासाठी पगार रु. 5200 ते रु. 20200 पर्यंत + ग्रेड पे रु. 2,400. असा असतो

असे असेल परीक्षेचे स्वरूप

सामान्य ज्ञान – प्रश्न संख्या 25, गुण 50
बौद्धिक चाचणी – प्रश्न संख्या 25, गुण 50
मराठी भाषा – प्रश्न संख्या 25, गुण 50
इंग्रजी भाषा – प्रश्न संख्या 25, गुण 50
एकूण – प्रश्न संख्या 100, एकूण गुण 200

कसा असतो तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम?

मराठी :

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द इ.)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

इंग्रजी :

व्याकरण (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दलेखन, विरामचिन्हे, काल, आवाज, कथन, लेख, प्रश्न टॅग इ.)
शब्दसंग्रह (वाक्प्रचार आणि वाक्यांशांचा वापर आणि त्यांचे अर्थ, अभिव्यक्ती)
वाक्यातील रिकाम्या जागा भरा
साधी वाक्य रचना (त्रुटी, वाक्याचे प्रकार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *