बहुप्रतीक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात 4 हजार 664 जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्यातील तलाठी गट ‘क’ (Group ‘c’) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण तसेच अमरावती या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील तलाठ्यांच्या 4 हजार 664 पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. त्यानुसार, तलाठ्यांमधील नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी, यासाठी ‘पेसा’ नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. यासंदर्भात सरकारला कळविण्यात आले आहे.

याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायत म्हणाले की, या परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितली आहे. 20 जूनला ही लिंक खुली झाली आहे. सुमारे पाच लाख उमेदवार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे.

साधारण गटासाठी एक हजार, तर आरक्षण गटासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असेल. तलाठी पदाच्या परीक्षेचे प्रारूप तयार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नाही. त्यामुळे लवकरच परीक्षेच्या अर्जाच्या नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार आहे.

त्यानंतर 21 दिवसांची मुदत परीक्षा अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे. गडचिरोली, चंद्रपुर, नंदुरबार, धुळे, अमरावती यांसारख्या 12 जिल्ह्यांमध्ये आदिवासींचे प्राबल्य आहे.

तलाठी भरती 2023 : पहा जिल्हानिहाय जागा..

आवश्यक कागदपत्रे – तलाठी भरतीसाठी या कागदपत्रांची यादी ठेवा तयार..

1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )

2) 10 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

3) 12 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

4) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)

5) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र (केली असल्यास)

6) इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)

शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे :

1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)

2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)

3) जातीचा दाखला (Caste Certificate)

4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)

5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)

6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)

7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

तलाठी भरती 2023 : जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा 

तलाठी भरती 2023 : किती असणार पगार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *