केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या महिनाभरात त्यांना सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. ही भेट त्याच्या महागाई भत्त्याशी संबंधित आहे. जुलैनंतर महागाई भत्त्यात किती वाढ होणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जातो. पण, आता नवीन महागाई भत्ता किती वाढणार ? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे.
दरम्यान, AICPI निर्देशांकाचे आकडे सूचित करत आहेत की, यावेळी महागाई भत्त्यात (DA) प्रचंड वाढ होणार आहे. एप्रिल 2023 पर्यंतचे आकडे आले आहेत. मे आणि जूनची आकडेवारी येणार आहे. 10 दिवसांनंतर म्हणजेच 30 जून रोजी मे महिन्याचे आकडे उघड होणार आहे. ज्यावरून महागाई भत्ता किती वाढला हे स्पष्ट होणार आहे.
DA मध्ये 4% वाढ झाली निश्चित..
तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार आहे. AICPI निर्देशांकाची संख्या सध्या 134.2 अंकांवर आहे. जानेवारी 2023 पासून आत्तापर्यंत, संख्यांमध्ये सुमारे 2 अंकांची वाढ झाली आहे. तसेच, डीए स्कोअरमध्ये एकूण 2.69 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आता मे आणि जूनचे आकडेही यायचे आहेत. महागाई भत्त्यात किमान 1 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या स्थितीत महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढेल. तज्ज्ञांच्या मते, निर्देशांकात थोडीशी झाली तरी डीए 1 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
135 गुणांवर पोहोचला तर काय होईल ?
AICPI निर्देशांकाचा आकडा 135 वर पोहोचला तर महागाई भत्त्यात नक्कीच मोठी झेप घेता येईल. पण, तरीही DA स्कोअर केवळ 4 टक्क्यांनी वाढेल. एकूण 42+4 = 46% महागाई भत्ता असू शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे मोठं गिफ्ट असणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे इतर भत्त्यांमध्येही वाढ होत असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळाला आहे.
कसा वाढला जातो DA Hike?
केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता ग्राहक महागाईवर अवलंबून असतो, म्हणजेच अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक. जर या आकड्यात सतत वाढ होत असेल तर त्याच क्रमाने महागाई भत्ताही वाढतो. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील ग्राहक महागाईचे आकडे चार महिन्यांवर आले आहेत. यामध्ये फेब्रुवारीमध्ये किंचित घट झाल्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये चांगली वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये AICPI निर्देशांक 134.2 अंकांवर होता. हे पुष्टी करते की, आगामी काळात महागाई भत्ता 4% दराने वाढेल. परंतु, मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहे. जर हा निर्देशांक 1134.5 वर गेला तर महागाई भत्ता 4% वाढू शकतो.
नव्या फॉर्म्युल्यातून मिळणार महागाई भत्ता..
7 व्या वेतन आयोगांतर्गत, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महागाई भत्त्याच्या कॅल्क्युलेशनचे सूत्र बदलले होते. कामगार मंत्रालयाने 2016 मध्ये DA कॅल्क्युलेशचे आधार वर्ष बदलले आहे. मजुरी दर निर्देशांक (WRI-मजुरी दर निर्देशांक) ची नवीन मालिका प्रसिद्ध झाली आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, 2016=100 आधारभूत वर्ष असलेली WRI ची नवीन मालिका मूळ वर्ष 1963-65 च्या जुन्या सीरीजची जागा घेईल.