Take a fresh look at your lifestyle.

मुंबई-करांसाठी खुशखबर ! देशातली पहिली वॉटर टॅक्सी सेवा होणार सुरु, या 2 शहरांचे अंतर तासाभरात होणार पूर्ण, असा असणार तिकीट दर..

0

गेट ऑफ इंडिया मुंबई ते बेलापूर ही वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. मुंबई प्राधिकरणाने नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला यासंदर्भात परवानगी दिली आहे.

ही सेवा सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी फेरी सुरू करण्यात येणार आहे. देशात सर्वात पहिली वॉटर टॅक्सी सेवा नोव्हेंबर 2022 पासून मुंबई ते अलिबाग या मार्गावर सुरू झाली.

मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा यादरम्यान ही सेवा सुरू होती; परंतु प्रतिसादा अभावी सेवा बंद करण्याचा कंपनीने गेट ऑफ इंडिया मुंबई ते निर्णय घेतला होता.

आता नयनतारा बेलापूर अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळ आणि संध्याकाळी प्रत्येकी 1 अशा फेऱ्या या वॉटर टॅक्सीच्या होणार आहेत.

फेऱ्यांच्या संभाव्य वेळा

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया – सकाळी 8.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर सायंकाळी 6.30 वाजता

तिकीट किती असेल ?

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया अंतर 60 मिनिटांमध्ये पार करता येणार असून, त्यासाठी 300 ते 400 रुपये तिकीट दर आकारले जाणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते बेलापूर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.