भारतातलं सर्वात शेवटचं रेल्वे स्टेशन, जिथे स्वातंत्र्यानंतरही काहीचं बदललं नाही, ब्रिटिशांनी ज्यावेळी सोडलं आत्ताही सर्वकाही तसंच..
भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे. तुम्हाला भारत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचं असेल तर तुम्हाला सहज रेल्वे सेवा मिळेल. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. अशा स्थितीत भारतातील शेवटचं स्टेशन कोणतं ? याचा कधी विचार केला आहे का ?
सिंहाबाद रेल्वे स्थानक हे भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन्स म्हणून ओळखलं जातं. हे स्टेशन बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. स्वातंत्र्यानंतर इंग्रज भारत सोडून गेले, पण स्वातंत्र्यानंतरही या स्थानकात काहीही बदल झाला नाही. आजही सर्व काही ब्रिटिशकालीन आहे. जाणून घेउया या स्टेशन्सबद्दल..
कधी काळी कोलकाता आणि ढाका दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करत असे..
सिंहाबाद रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. एकेकाळी या स्थानकावरून अनेक गाड्या जात असत. हे स्टेशन कोलकाता आणि ढाका दरम्यान संपर्क प्रस्थापित करत असे. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांसारख्या लोकांनीही ढाका गाठण्यासाठी या मार्गाचा वापर केला आहे. मात्र आज हे स्टेशन पूर्णपणे निर्जन झालं आहे.
आजही येथील सर्व काही आहे ब्रिटिशकालीन..
देश स्वतंत्र झाला, पण सिंहाबाद रेल्वे स्थानकात काहीही बदल झाला नाही. आजही येथील सर्व काही ब्रिटिशकालीन आहे. सिग्नलिंगसाठी या स्थानकावर आजही हँड गिअर्सचा वापर केला जातो. सिग्नल, दळणवळण आणि स्टेशनशी संबंधित सर्व उपकरणे, टेलिफोन आणि तिकिटे इत्यादी देखील ब्रिटिशकालीन आहेत. स्टेशनवर एक रेल्वे बोर्ड आहे, ज्यावर ‘भारताचे शेवटचे स्टेशन’ असे लिहिले आहे.
स्टेशनच्या नावावर एक छोटे स्टेशन ऑफिस आहे.
एक काळ असा होता की दार्जिलिंग मेलसारख्या गाड्या इथून जात होत्या, पण आता सिंहाबाद रेल्वे स्थानकावर एकही प्रवासी गाडी थांबत नाही, त्यामुळे इथून कोणतीही हालचाल होत नाही. प्रवासी गाड्या न थांबल्याने येथील तिकीट काउंटर नेहमीच बंद असते. स्थानकावर कर्मचारी कमी आहेत. स्थानकाच्या नावाने फक्त एक छोटे स्टेशन ऑफिस दिसते.
स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो.
या रेल्वे स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. असे म्हटले जाते की 1971 नंतर, जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली, तेव्हापासून भारत आणि बांगलादेश दरम्यान प्रवासाची मागणी वाढू लागली. 1978 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या करारानुसार भारतातून बांगलादेशात मालगाड्या धावू लागल्या.
2011 मध्ये या करारात पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आणि त्यात नेपाळचा समावेश करण्यात आला. आज बांगलादेश व्यतिरिक्त नेपाळला जाणाऱ्या मालगाड्याही या स्थानकावरून जातात आणि अनेकवेळा थांबल्यानंतर सिग्नलची वाट पाहत असतात.