सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या भावाची देशभरात चर्चा सुरू असून कांद्याचे नाव घेताच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांवर आक्रमक होत आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या एका शेतकऱ्याने 512 किलो कांदा बाजारात विकला होता. आश्चर्याची बाब म्हणजे इतके कांदे विकून त्यांना केवळ 2.49 रुपयांचा चेक देण्यात आला.

महाराष्ट्रात यावेळी कांद्याचे उत्पादन जास्त असल्याने शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सध्या कांद्याचा आणखी एक मुद्दाही शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

खरं तर, ब्रम्हनाळ गावातील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याच्या शेतात खूप मोठा कांदा पिकला आहे, ज्याचे वजन 700 ते 800 ग्रॅम पर्यंत आहे. आता परिसरातील शेतकरीही एवढ्या वजनाचा कांदा पाहण्यासाठी जमू लागल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्राह्मणाळ गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतात हा कांदा पिकवला आहे. सांगलीतील या शेतकऱ्याच्या शेतात कांद्याचे जबरदस्त पीक आले आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे. कांदा पाहून लोकांना हा कांदा आहे की, कांदोबा, असं म्हणायला भाग पाडले जात आहे. वास्तविक कांद्याच्या वजनाने सर्वांनाच हैराण केलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक.. 

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. विरोधकांची आक्रमक वृत्ती पाहून त्याची प्रचिती येते. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक जोरदार आवाज उठवणार आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबताना दिसत नाहीये..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *