BREAKING : अखेर तो GR आला, राज्यातल्या ‘या’ शिक्षकांच्या पगारात झाली दुप्पटीने वाढ, पहा, आजचा शासन निर्णय…
राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्त्वावर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 21 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील या शिक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांत या शिक्षकांच्या माध्यमातून मुंबईमध्ये एक मोठं आंदोलनउभं करण्यात आलेलं होतं. याच आंदोलनाच्या माध्यमातून या शिक्षकांकडून आपल्याला दिल्या जाणाऱ्या वेतनामध्ये वाढ करावी अशा मागणी करण्यात आली होती.
याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून 2006 मध्ये शासन निर्णय घेऊन या शिक्षकांसाठी वेतन निश्चित करण्यात आलं होतं, ते खालीलप्रमाणे पहा..
1) उच्च माध्यमिक स्तर
(a) पूर्ण अर्हताधारक शिक्षक – 72 रु. प्रति घड्याळी तास
(b) अपूर्ण अर्हताधारक शिक्षक – 54 रु. प्रति घड्याळी तास
२ ) माध्यमिक स्तर :-
(a) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 54 रु. प्रति घड्याळी तास
(b) अप्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 43 रु. प्रति घड्याळी तास
अशा अल्प प्रमाणात वेतन दिलं जातं होतं. या तोडक्या वेतनात शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? अशी आर्क मुख्यमंत्र्यांना शिक्षकांच्या माध्यमातून मागण्यात आली होती. आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर 2022 मध्ये शासन निर्णय काढून मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पहा, शासन निर्णयामध्ये नेमकं काय ?
राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते.
याबाबत 2006 अन्वये माध्यमिक , उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वांवर नियुक्त शिक्षकांना द्यावयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये पुढीलप्रमाणे वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
पहा, सुधारित दर..
नियम व अटी पहा..
1 घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असावेत .
अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये . सदर शासन निर्णय दि .01 / 12 / 2022 पासून अंमलात येणार आहे.