विज्ञानाचा चमत्कार अन् शास्रज्ञांची कमाल…! विना सूर्यप्रकाशात मंगळ ग्रहावर होणार टोमॅटोची लागवड ; शास्त्रज्ञांनी शोधला मार्ग…

0

शेतीशिवार टीम, 30 जून 2022 : विज्ञान हा विषय म्हणून शिकत असताना, आपल्याला हे माहितचं आहे की, वनस्पतींना त्यांचे अन्न बनवण्यासाठी आणि वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतात. परंतु नवीन पद्धतीमुळे सूर्यप्रकाशाशिवाय म्हणजेच पूर्ण अंधारातही वनस्पतींची वाढ शक्य आहे.

सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पती वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी कृत्रिम प्रकाशसंश्लेषणाची अशी पद्धत तयार केली आहे, ज्यामुळे पृथ्वीवर वनस्पती वाढवण्याचे नवीन मार्ग उघड होऊ शकतात. या पद्धतीमुळे मंगळावरही एक दिवस रोपे उगवता येणार आहे.

वास्तविक, वनस्पती नैसर्गिकरित्या ऑटोट्रॉफिक असतात. म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईड, पाणी आणि खनिजे ते त्यांचे अन्न तयार करण्यासाठी वापरतात. ही प्रक्रिया प्रकाशसंश्लेषणाद्वारे होते, ज्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

परंतु अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांसह इतरांचं असं म्हणणं आहे की, ही नैसर्गिक प्रक्रिया कुचकामी आहे, कारण सूर्यप्रकाशात आढळणारी ऊर्जा केवळ 1% वनस्पतीपर्यंत पोहोचते. शास्त्रज्ञ सध्या चवळी, टोमॅटो, तंबाखू, तांदूळ, कॅनोला आणि हिरवे वाटाणे या पिकांसाठी उत्पादन पद्धतींचे मूल्यांकन करत आहेत, जे अंधारात लागवड करताना एसीटेट कार्बन वापरतात.

शास्त्रज्ञांनी कृत्रिम प्रकाशसंश्लेषणाचा वापर करून वनस्पती वाढवण्याचा मार्ग शोधला आहे, गेल्या आठवड्यात नेचर फूड या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून हे समोर आलं आहे.

इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या प्लांट ट्रान्सफॉर्मेशन रिसर्च सेंटरच्या संचालिका मार्था ओरोझ्को-कार्डेनास यांचं असं म्हणणं आहे की, ‘अंधारात आणि मंगळावर टोमॅटोची रोपे वाढवणार्‍या महाकाय जहाजांसाठी हे सर्व किती सोपे असेल याची कल्पना करा…

या संशोधनांतर्गत कार्बन डायऑक्साइड, वीज आणि पाण्याचे ॲसिटेटमध्ये रूपांतर करण्यासाठी दोन- स्टेप रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये व्हिनेगर हा मुख्य घटक होता. संशोधकांना असे आढळून आले की, अन्न-उत्पादक जीव अंधारात ॲसिटेटचे सेवन करतात.

ही रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी सौर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करण्यात आली. शास्त्रज्ञांनी सांगितले की, या प्रणालीमुळे काही वनस्पतींची वाढ आणखी सुधारू शकते. ते स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी 18 पटीने चांगले कार्य करू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.