Take a fresh look at your lifestyle.

आता 5000 / 10,000mAh नव्हे तर तब्बल 50,000mAh चा पॉवरबँक ; 18W, 20W का फास्ट-चार्जिंग सपोर्ट, किंमत फक्त…

0

शेतीशिवार टीम, 30 जून 2022 : Ambrane कंपनीने भारतात आपली ‘Stylo Max’ 50000mAh पॉवर बँक लॉन्च केली आहे. Stylo Max Power Bank बँक डिजिटल कॅमेरे आणि लॅपटॉप सारख्या मोठ्या डिव्हाईसला ही पॉवर देते, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या मते, ही पॉवरबँक एका फोनला अनेक वेळा पूर्णपणे चार्ज करू शकते. अँब्रेन स्टायलो मॅक्स पॉवर बँकला 9 लेयर्सच्या चिपसेट प्रोटेक्‍शनह तयार केली गेली आहे. हे ओव्हरहाटिंग आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करतं.

Ambrane Stylo Max ची किंमत :-

Ambrane च्या Stylo Max Power Bank ची किंमत 3,999 रुपये आहे आणि ती Flipkart वरून खरेदी केली जाऊ शकते. युजर्स ते Ambrane च्या अधिकृत वेबसाइटवरून देखील खरेदी करू शकतात. Ambrane Stylo Max Power Bank ब्लॅक आणि ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या पॉवर बँकेवर 180 दिवसांची वॉरंटीही देत ​​आहे.

Ambrane Stylo Max चे डिटेल्स आणि फीचर्स :-

Ambrane ची पहिली पॉवर बँक, स्टायलो मॅक्स, 50,000mAh कपॅसिटीच्या लिथियम पॉलिमर बॅटरीसह ग्रेडियंट मॅट मेटॅलिक बॉडी आहे. यात पॉवर डिलिव्हरी तंत्रज्ञानासह 20W फास्ट-चार्जिंग आउटपुट आहे. ही पॉवर बँक 18W फास्ट चार्जिंग इनपुटवर चार्ज केली जाऊ शकते. स्टायलो मॅक्स पॉवर बँक डिजीटल कॅमेरे आणि लॅपटॉप सारख्या मोठ्या डिव्हाईसला पॉवर देते. ही पॉवर बँक 30 मिनिटांत आयफोन आणि अँड्रॉइड डिव्हाईस 50 टक्के चार्ज करू शकते.

यात 2 USB आणि एक Type-C पोर्ट आहे, ज्याद्वारे ते एकाच वेळी तीन डिव्हाईस चार्ज करू शकते. ही पॉवर बँक USB किंवा Type-C पोर्टद्वारे चार्ज करता येणार्‍या सर्व डिव्हाईससह कार्य करते.

सेफ्टी आणि प्रोटेक्शनसाठी, या पॉवर बँकमध्ये 9-लेयर चिपसेट प्रोटेक्‍शन आहे. हे या पॉवरबँकचे अतिउष्णतेपासून आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करते. कंपनीचे म्हणणे आहे की ही, पॉवरबँक आपोआप पॉवर आउटपुटचे नियमन करते जेणेकरून प्रत्येक कनेक्ट केलेले डिव्हाईस ॲटोमॅटिकलीपणे चार्ज होईल.

या पॉवर बँकेची किंमत 3,999 रुपये आहे. पॉवरबँक फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. युजर ते Ambrane च्या अधिकृत वेबसाइटवरून देखील खरेदी करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.