Vande Bharat : गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर ! रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल, पहा वेळापत्रक, स्टेशन्स अन् तिकीट दर..
देशभरातील जवळपास सर्वच राज्यांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. जलद धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांमध्ये प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. मुंबई ते गोवा या मार्गावरील वंदे भारत खूप लोकप्रिय झाली आहे. या मार्गावरून वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणे लोकांना खूपच पसंद पडत आहे. आता प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर गोव्याला जाणारा प्रत्येक प्रवासी आनंदाने हुरळून जातील..
वास्तविक, भारतीय रेल्वेने मुंबई – गोवा मार्गावरील वंदे भारतच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. पूर्वी ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावायची, आता या ट्रेनचा आनंद प्रवाशांना सहाही दिवस घेता येणार आहे.
आता हप्ताभर धावणार वंदे भारत ट्रेन..
सणासुदीचा हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने, दिवाळी आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी कोकण आणि गोव्याला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रेल्वेकडून नवे वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. या नव्या वेळापत्रकातील सर्वात मोठा बदल म्हणजे आता या मार्गावर वंदे भारत ट्रेन सहा दिवस धावणार आहे. म्हणजेच शुक्रवार वगळता प्रवाशांना सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी वंदे भारत मार्गे प्रवास करता येणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस वापरणारे बहुतांश प्रवासी हे 15 – 30 वर्षे आणि 31-45 वयोगटातील आहेत. मुंबई – गोवा मध्य रेल्वे मार्गावर सध्या वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळा धावते. सध्या आठवड्यातून तीन दिवस धावणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस लवकरच आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. रेल्वेच्या मेंटेनन्स आणि दुरुस्तीसाठी शुक्रवारचा दिवस ठेवण्यात आला आहे.
वंदे भारत ट्रेनचे टाइम टेबल..
या मार्गावर वंदे भारत ट्रेनचे दोन वेळापत्रक आहे. एक बिगर मान्सूनसाठी आणि दुसरा मान्सूनसाठी. नॉन-मान्सून वेळापत्रकात, ट्रेन मुंबईतील सीएसएमटी येथून पहाटे 5:35 वाजता सुटते आणि मडगावला दुपारी 1:15 वाजता पोहोचते. यानंतर ही गाडी मडगावहून 2.35 वाजता परत निघते आणि नंतर 10.25 वाजता सीएसएमटीला पोहोचते.
या मार्गावरील भाड्यांबद्दल बोलायचे तर ते वेगवेगळे आहेत. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबते. चेअर कारचे भाडे 1,100 ते 1,600 रुपयांपर्यंत आहे, तर एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकिटांची किंमत 2,000 ते 2,800 रुपये आहे.