वर्धा – यवतमाळ – नांदेड या 284 किलोमीटर नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे काम यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यापर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळेच या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येण्याची विनंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना खा. भावना गवळी यांनी केली होती. ही मागणी प्रधानमंत्र्यांनी मान्य केली असून 28 फेब्रुवारीला यवतमाळ येथील कार्यक्रमातून रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  

खा. भावना गवळी यांनी प्रत्यक्ष भेटून रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे प्रकल्पाचे कळंबपर्यंत उद्घाटन करण्याची विनंती केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यात आले असताना त्यांनीही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती.

त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या पीएम पोर्टलवर हा प्रकल्प अपलोड करण्यात आला आहे. ही रेल्वे लवकरच यवतमाळ शहरात प्रवेश करणार आहे. या प्रकल्पाकरिता आवश्यक भूमि अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली आता कळंबपर्यंत रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

28 फेब्रुवारी रोजी कळंब येथून वर्धापर्यंत रेल्वे धावणार आहे या रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यवतमाळ येथील कार्यक्रमातून हिरवी झेंडी दाखवतील.

कळंब ते यवतमाळ लवकर रेल्वे ट्रायल घेण्याकरिता बांधकाम वेगाने सुरु असून शकुंतला रेल्वेला ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शकुंतलाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाल्यास यवतमाळकरांना मुंबईला जाण्याची अडचण दूर होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे शकुंतला रेल्वेचा प्रश्न खा. गवळी संसदेत उचलला तसेच रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून फास्ट ट्रॅक तत्वावर गती देण्याची मागणी केली. शकुंतला रेल्वेचा प्रश्नही थेट प्रधानमंत्री मोदी यांना सांगून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खा भावना गवळी यांनी सांगितले..

पहा रेल्वे रूट आणि टाइम टेबल..    

वर्धा कळंब मार्गावर 15 मोठे पूल, 29 बोगदे व 5 उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

वर्धा – देवळी – भिडी – कळंब या रेल्वे स्थानकांदरम्यान पॅसेंजर रेल्वे गाडी रविवार व बुधवार वगळून आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे.

गाडी क्रमांक 51119 ही वर्धा येथून सकाळी 8 वाजता सुटणार असून देवळी येथ 8.25, भिडी येथे 8.42 व कळंब येथे 9.10 वाजता पोचणार आहे.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 51120 ही कळंब येथून सकाळी 10 वाजता सुटणार असून 10.20 वाजता भिडी, 10.32 देवळी व सकाळी 11.10 वाजता वर्धा येथे पोहचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *