आजकाल भारतातील अनेक भागात हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून त्यामुळे हाहाकार माजला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, उन्हापासून वाचण्यासाठी लोकांना छत्री घेऊन बाहेर पडावे लागत आहे..
तर दक्षिण भारतातील बहुतांश भागात तापमान 60 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे, त्यामुळे लोकांना बाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. पहाटेच्या सुमारास डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली, त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.. आता या बदलत्या हवामानामुळे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात कसे असणार हवामान..
IMD नुसार, शनिवारी राज्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा 1 अंश कमी म्हणजेच 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या आठवड्यात 6 तारखेपर्यंत काही प्रमाणात हलके ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.
पंजाबरावांच्या मते, येत्या 3 दिवसानंतर म्हणजे 7 ते 11 मे दरम्यान राज्यात पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असून गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्व विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान, विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस होईल. 7 मेच्या आधी हळद, कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 7 मेपासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 6 मेपर्यंत कांदा, कापूस, हळद पिकांची काढणी करुन ते नीट झाकून ठेवा, असा सावधगिरीचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे कुठे त्रास होईल ते जाणून घ्या..
IMD नुसार, पश्चिम बंगाल, झारखंड, सौराष्ट्र-कच्छ, मराठवाडा आणि किनारी आंध्र प्रदेशात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
येत्या आठवड्यात अनेक भागांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचीही अपेक्षा आहे. शुक्रवारी अनेक भागात कमाल तापमान 43 ते 46 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले.