Take a fresh look at your lifestyle.

Interview question : कोणत्या झाडाचं लाकूड सर्वात मजबूत मानलं जातं ?

0

शेतीशिवार टीम, 11 डिसेंबर 2021 : आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) होण्याचं स्वप्न पाहण्यासाठी तरुणांना कठोर अभ्यास करावा लागतो. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेची तयारी करतात परंतु ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणारे विद्यार्थी फार कमी आहेत. ही यूपीएससी (UPSC) परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते.

पहिले दोन टप्पे लिखित आहेत आणि तिसरा टप्पा तोंडी आहे. मुलाखतीदरम्यान असे अनेक गुंतागुतीचे प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे पटकन देणे सोपं नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत जे मुलाखतीदरम्यान विचारले गेले आहेत…

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे, जी आपल्याला दोनदा फुकट मिळते पण नंतर मिळत नाही ?
उत्तर : दात

प्रश्न : चंद्रावर दुसरे पाऊल कोणी टाकले होते

उत्तर : नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं आणि दुसरंही पाऊल टाकलं.

प्रश्न : लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठं शहर कोणतं आहे ?
उत्तर : टोकियो

प्रश्न : एक भिंत बांधायला आठ माणसांना दोन दिवस लागतात, तर तीच भिंत बांधायला चार माणसांना किती वेळ लागेल ?
उत्तर : ती भिंत आधीच तयार असल्यामुळे वेळ लागणार नाही.

प्रश्न : असा कोणता खाद्यपदार्थ आहे जो कधीही खराब होत नाही ?
उत्तर : मध कधीच खराब होत नाही.

प्रश्न: जगातील कोणत्या देशात कुत्रे पाळणे कायदेशीर गुन्हा मानला जातो ?
उत्तर: आइसलँड

प्रश्न: जगातील कोणते देश आहेत जेथे तुम्ही Coca-Cola खरेदी करू शकत नाही ?
उत्तरः उत्तर कोरिया आणि क्युबा

प्रश्न :  हिंदीमध्ये पासवर्डला काय म्हणतात ?
उत्तर : पासवर्डला हिंदीत कूट म्हणतात.

प्रश्‍न : असा कोणता देश आहे जेथे डास आढळत नाहीत ?
उत्तर : आइसलँड

प्रश्न : भाक्रा नागल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर : सतलज नदीवर

प्रश्न : कोणत्या पक्ष्याला पंख नसतात ?
उत्तर : किवी

प्रश्न : कोणत्या झाडाचे लाकूड सर्वात मजबूत मानलं जातं ?
उत्तर : देवदार आणि शीशमचे लाकूड हे सर्वात मजबूत मानलं जातं.

Leave A Reply

Your email address will not be published.