शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- शनिदेवाला न्यायाचा देवता मानलं जातं. असे मानले जाते की शनिदेव हे व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात. वाईट कर्म करणाऱ्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो,तर जे लोक परोपकारी असतात, त्यांच्या जीवनातील प्रत्येक दुःखाचा अंत होतो.नोकरी-व्यवसायावरील सततची संकटेही दूर होतात.अशा परिस्थितीत जर तुम्हालाही शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर प्रत्येक शनिवारी काही खास मंत्र आणि उपाय करावेत.
चला तर मग जाणून घेऊया, शनिदेवाचे मंत्र:-
1. शनि महामंत्र:-
ॐ निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
2. शनीचा पौराणिक मंत्र
ऊँ ह्रिं नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
छाया मार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।
3.शनि दोष निवारण मंत्र
ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम।
उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।।
4. नोकरी आणि व्यवसायासाठी शनी मंत्र
ॐ शं शनैश्चराय नमः।।
शनिदेवाला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय :-
1) साडेसाती आणि ढैया टाळण्यासाठी लोखंडी ‘अंगठी’ आणावी. दर शनिवारी सकाळी मोहरीच्या तेलात बुडवून ठेवा. संध्याकाळी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा. त्यांची विधीवत आरती करावी. यानंतर डाव्या हाताच्या मधल्या बोटात ती लोखंडी अंगठी घालावी.
2) या दिवशी काळं उडीद डाळीची खिचडी काळे मीठ टाकून खावी. यामुळे शनिदोषामुळे होणारा त्रासही कमी होतो.
3) जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात यश मिळत नसेल तर शनिश्चरी अमावस्येला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यानंतर “ॐ शनैश्चराय नमः” या मंत्राचा 12वेळा जप करा. पिंपळाच्या झाडाच्या फांदीला काळा धागा बांधावा,आणि त्याला तीन गाठी घाला.
4) शनिवारी संध्याकाळी एक-दोन गोर-गरीबांना पोटभर अन्न द्या. त्याला काही पैसेही देऊ शकता. रोटी, पराठा, डाळ-भात, भाजी, मिठाई आणि खीर यांचा आहारात समावेश करा.