Take a fresh look at your lifestyle.

तुम्हालाही रोज भात खाण्याची सवय आहे का ? शरीराचं होऊ शकतं मोठं नुकसान, वाचा सविस्तर

0

शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021 :- भारतातील बहुतेक लोकांना भात खाणे आवडते. दररोज प्रत्येकाच्या घरी दिवसातून एक वेळ का होईना भात बनवला जातो. पण तुम्हाला जास्त भात खायला आवडतो का? जर तुम्हालाही सतत भात खाण्याची सवय असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भात खात असाल आणि त्याच्या प्रमाणाची काळजी घेत नसाल तर तुम्ही ही सवय ताबडतोब बदलावी. भात जास्त प्रमाणात खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला त्याचे काही तोटे सांगणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया सविस्तर :-

1. पचनाशी संबंधित समस्या :-

पांढऱ्या भातात फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. म्हणूनच जास्त भात खाणे टाळणे फार महत्वाचे आहे. कारण जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर आपली पचनशक्ती कमकुवत होते आणि त्यामुळे गॅसची समस्या निर्माण होते. यासोबतच पचनाशी संबंधित इतर समस्याही होऊ लागतात. त्यामुळे जास्त भात खाणे टाळावे.

2. Vitamins-C ची कमतरता :-

भात खाल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे मिळत नाहीत. यामध्ये व्हिटॅमिन-सीचे प्रमाण कमी असल्याने हाडांना अजिबात फायदा होत नाही.जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे जास्त भात खाणे कधीही टाळावे.

3.मधुमेह :-

भात रोज किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. जर तुम्हाला आधीच मधुमेहाची समस्या असेल तर पांढरा भात खाऊ नका. पांढऱ्या तांदळाऐवजी तुम्ही ब्राऊन राइस वापरू शकता. ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

4.लठ्ठपणाची समस्या :-

शिजवलेल्या भातामध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो . जर तुम्हाला आधीच लठ्ठपणाची समस्या असेल तर भाताचे सेवन फार कमी प्रमाणात करावे.

५. भात अति खाणे :-

भात खाल्ल्याने पोट लवकर भरते, तसेच भात खाल्ल्यानंतर तुम्हाला वारंवार भूक लागते आणि तुम्ही जर प्रमणापेक्षा जास्त भात खात असाल,तर त्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो तसेच मोठ्या समस्या निर्माण होतात.

Leave A Reply

Your email address will not be published.