क्रिकेट विश्व हादरलं ! सरावानंतर अचानक घशात त्रास ; रुग्णालयात जाण्याआधीच हृदय विकाराचा तीव्र झटका अन्….
शेतीशिवार टीम, 11 डिसेंबर 2021 : अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव शहरातील गजानन नगर या ठिकाणी एका क्रिकेटपटूचा क्रिकेट सरावादरम्यान हृदयविकाराच्या तीर्व झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यासह सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
संबंधित तरुण गुरुवारी सायकांळी क्रिकेट ग्राउंडवर सीझन बॉलने सराव करण्यासाठी गेला होता. सराव झाल्यानंतर अचानक त्याच्या घशात त्रास व्हायला लागला. याची माहिती त्याने अन्य खेळाडूंना देताच, त्यांनी त्वरित संबंधित खेळाडूला खाजगी रुग्णालयात हलवलं.
त्यानंतर पुढील उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केलं.
लोकेश अर्जुन ढोबळे (वय 27, गजानन नगर, कोपरगाव) असे मृत झालेल्या युवा खेळाडूचे नाव आहे. तो एक गुणी खेळाडू असून तालूक्यात त्याचा नावलौकिक होता. तो नेहमी शहरातील साई सिटी येथील क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेटचा सराव करण्यासाठी जात होता.