भारतात रस्ते पायाभूत सुविधांच्या आघाडीवर चांगले काम केले जात आहे. एक्सप्रेस – वे, महामार्गांपासून ते मोठे पूल, एलिव्हेटेड फ्लायओव्हर आणि बोगदे बांधले जात आहेत. याच भागात देशात आणखी एक मोठा बोगदा बांधला जात आहे. विशेष म्हणजे लांबीच्या बाबतीत हे दोन्ही बोगदे भारतातील इतर बोगद्यांपेक्षा जास्त असले तरी रुंदीच्या बाबतीतही ते जगातील सर्व बोगद्यांना मागे टाकणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस – वेवर खंडाळा घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही बोगद्यांचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील एक बोगदा 1.75 किमी लांबीचा आणि दुसरा 8.93 किमी लांबीचा असून 23 मीटर रुंदीचे दोन्ही बोगदे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठा बोगदा आहे, त्यात 4 लेन असतील. हा बोगदा केव्हा तयार होईल ते आपण जाणून घेणार आहोत.

हा बोगदा कधीपर्यंत तयार होणार :-

मुंबई – पुणे एक्सप्रेस – वे वर बांधण्यात येत असलेल्या या बोगद्यांच्या कामाची डेडलाइन सातत्याने वाढत आहे, कारण आधी लॉकडाऊनमुळे त्यांच्या कामात व्यत्यय आला, त्यानंतर मार्च 2024 ही डेडलाइन निश्चित करण्यात आली. TOI च्या अहवालानुसार, हे दोन्ही बोगदे जुलै 2024 पर्यंत तयार होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

का आहे हा बोगदा इतका खास..

6695 कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा हा बोगदा प्रकल्प स्वतःच खूप खास आहे. या बोगद्याची रुंदी 23.75 मीटर आहे, त्यामुळे या बोगद्याला जगातील सर्वात रुंद बोगदा म्हटले जाईल. या बोगद्यात आग लागू नये यासाठी अधिक चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या बोगद्याच्या उभारणीमुळे मुंबई – पुणे हे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

बोगद्याच्या आत दगड पडू नयेत म्हणून जागोजागी रॉक बोल्ट तयार करण्यात आले आहेत, तसेच प्रत्येक 300 मीटरवर बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आग लागल्यास, हाय प्रेशर वाटर मिक्स त्वरित कार्यान्वित केली जाईल.

मुंबई – पुणे एक्सप्रेस – वे महामार्गाचे अंतर कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता लोणावळा ते खालापूर टोल पॉइंटपर्यंत वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून 500 मीटरपेक्षा जास्त उंच आहे. या बोगद्याला एक्स्प्रेस वेशी जोडण्यासाठी केबल – स्टेड ब्रिज बांधण्यात येत आहे.

चीनमध्ये 13.7 मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. हा 16.62 किलोमीटर लांबीचा बोगदा यांगझी नदीखालून जातो, परंतु मुंबई – पुणे एक्स्पप्रेस – वे वरील खंडाळा बोगदा 23 मीटरपेक्षा जास्त रुंद असणार आहे.

मुंबईहून फक्त 90 मिनिटांत गाठता येणार पुणे..

प्रस्तावित लिंक – वे कॉरिडॉर तयार झाल्यानंतर, 20-25 मिनिटांत मुंबई ते पुणे एक्सप्रेस – वेवर सहज पोहोचणे शक्य होईल. त्यानंतर पुण्यापर्यंत 60 ते 70 मिनिटांत प्रवास करता येतो. सध्या मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवर जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो. वाशीतून जाताना वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात या मार्गावर अधिक समस्या निर्माण होतात. विस्तारानंतर प्रवासाचा वेळ एक तासापेक्षा जास्त वाचणार आहे.

 

मुंबईत सर्वात मोठा सागरी पूल..

MMRDA कडून समुद्रावर देशातील सर्वात लांब 21.8 किमीचा पूल बांधला जात आहे. मुंबई बाजूला शिवडी ते नवी मुंबई बाजूला चिर्ले जोडणाऱ्या सुमारे 18,000 कोटी रुपयांचे MTHL बांधकाम सुरू आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प जपान सरकारच्या JICA या वित्तीय संस्थेच्या मदतीने राबविण्यात येत आहे. एमटीएचएलचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तो सुरू झाल्यानंतर या पुलावरून दररोज 70 हजार वाहने ये – जा करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *