Take a fresh look at your lifestyle.

जगातला पहिला खोल बोगदा महाराष्ट्रात, 200 मीटर खोल, 12Km अंतरासाठी 8,137 कोटींचा खर्च; या 2 शहरांचं 1 तासांचं अंतर येणार 15 मिनिटांवर..

0

राज्यात सध्या मोठं – मोठे एक्सप्रेस- वे, हायवे, पूल आणि सी लिंक, भुयारी मार्गांच्या उभारणीचे काम जोमात सुरु आहे. तर पहिल्यांदाचं भारतात विशषतः मुंबई त तयार होणारे जपान – जर्मनी टेक्नॉलॉजीचे समुद्री पूल – भुयारी मार्ग प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये सर्वात चर्चेतला प्रोजेक्ट म्हणजे मुंबई ते रायगड जिल्ह्याला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प. या प्रकल्पाचे 90% काम झालं असून या नव्या वर्षाच्या दिवाळीपर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

आता मुंबईतच तयार होणारा दुसरा प्रोजेक्ट म्हणजे गोरेगाव – मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट, हा प्रकल्पाचे सर्वात मोठं वैशिष्टय म्हणजे हा बोगदा संजय गांधी नॅशनल पार्क मधून जमिनीपासून सुमारे 25 ते 200 मीटर खालून जाणार आहे.

महानगरातील वाहतूक समस्या सोडवण्यात कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळेपूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील अंतर खूपच कमी होणार आहे.

हेही वाचा :- शिर्डी ते मुंबई समृद्धी महामार्ग : 7.78Km च्या बोगद्यासाठी 2745 कोटींचा खर्च, बोगदाही झाला तयार, पहा फक्त 2 तासांत गाठता येणार मुंबई..

आता या प्रकल्पाच्या कामला गती मिळणार असून याबाबत महत्वाचं अपडेट हाती आलं आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाशी संलग्न असलेल्या प्रादेशिक अधिकार प्राप्त समितीने (REC) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नावे 19.43 हेक्टर राखीव वनजमीन वळवण्यासाठी 12 Km गोरेगाव मुलुंड लिंक रोड (GMLR) च्या बाजूने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली 3 + 3 लेन बोगद्याच्या बांधकामासाठी ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे. REC ने अंतिम मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त माहिती मागवली आहे.

8,137 कोटी रुपयांच्या GMLR प्रकल्पाला नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ (NBWL) आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ अँड इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) कडून आधीच मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळे आता बीएमसीने फेब्रुवारी 2023 पासून बांधकाम सुरू करण्याचा प्रस्ताव दिला असून डिसेंबर 2026 पर्यंतच रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं सांगितलं आहे.

कसा असणार हा प्रकल्प ? पहा थोडक्यात माहिती..

या 12.20 किलोमीटर लांब आणि 45.70 मीटर रुंद लिंक रोडच्या बांधकामासाठी 8 हजार 137 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बीएमसी आयुक्त आयएस चहल यांनी 2022-23 या वर्षाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड ‘या’ मार्गांना जोडला जाणार ..

BMC ने दावा केला आहे की, हा लिंक रोड तयार झाल्यानंतर पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील 1 तासाचे अंतर 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होईल, असा हा लिंक रोड ऐरोली रोडद्वारे नवी मुंबई प्रस्तावित विमानतळाला आणि कल्याण – डोंबिवलीला जोडला जाणार आहे. याद्वारे या भागांचा प्रवास सोपा होणार आहे.

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड (GMLR) ची खासियत..

पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील रत्नागिरी चौकात सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये 1.6 Km लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली 4.7 किमी लांबीचे 13 मीटर व्यासाचे दोन बोगदे बांधले जाणार आहे.

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी भांडुपच्या डॉ. हेडगेवार चौकात सहा पदरी उड्डाणपूल करण्यात येणार आहे.

हेही वाचा:- जगातला सर्वात मोठ्या रुंदीचा बोगदा महाराष्ट्रात,13.30Km च्या अंतरासाठी 7,000 कोटींचा खर्च, पुणे-मुंबई प्रवास होणार तासाभराने कमी, पहा रोडमॅप..

हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात GMLR अंतर्गत येणाऱ्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.तिसऱ्या टप्प्यात विविध चौकांमध्ये उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.
चौथ्या टप्प्यात पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गाच्या चौकात उड्डाणपूल आणि बोगदे बांधले जाणार आहे.

उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी 1666.06 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड हा पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा चौथा लिंक रोड असेल.

या लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणारी 101 अतिक्रमणे आतापर्यंत काढण्यात आली आहेत.

नॅशनल पार्कमध्ये राहणारे प्राणी आणि झाडांना कोणतीही हानी होऊ नये, यासाठी येथे जमिनीपासून 200 मीटर खाली बोगदा करण्यात येणार आहे.

पश्चिम उपनगरातील एक आणि पूर्व उपनगरातील एक अशा दोन उड्डाणपुलांचे काम सुरू करण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पूर्व उपनगरांतर्गत भांडुपमध्ये बांधण्यात येणाऱ्या डॉ. हेडगेवार जंक्शन चौक उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात जाड व्यासाचा आणि सर्वात खोल बोगदा पूर्ण केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.