Take a fresh look at your lifestyle.

Blood Pressure Risk : हाय ब्लडप्रेशर असेल तर झोपण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, अन्यथा झोपेतचं येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..

0

झोपेची कमतरता आणि उच्च रक्तदाब यांचा परस्परांशी संबंध आहे. उच्च रक्तदाब रोखण्यासाठी चांगली झोप तर आवश्यक तर आहे, इतकेच नाही तर अनेक वेळा उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर जास्त दाब येतो, अशा स्थितीत झोपेत असताना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते. झोपताना रक्तदाब वाढू नये यासाठी काही खास टिप्स डॉक्टरांनी सांगितल्या आहेत त्या आपण पाहूया..

उच्च रक्तदाबाची समस्या विशिष्ट वयातच उद्भवत होती, परंतु आता अस्वस्थ जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जास्त सोडियम – जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्याचबरोबर आणखी एक मोठं कारण यामध्ये समाविष्ट झालं आहे, ते म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणे आणि झोपेची पद्धत बदलणे. या सर्व गोष्टींमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढत चालला असून तरुणांमध्ये अकाली मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे.

फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. आतिश आनंद सांगतात की, उच्च रक्तदाबाच्या बाबतीत, हवेशीर थंड खोलीत 6 – 8 तास पुरेशी झोप घ्या. कॅफीन किंवा अल्कोहोल पिणे टाळा आणि चालण्यासारखा हलका व्यायाम करा आणि स्वतःला मोबाइल किंवा रात्री उशिरा मोबाइलच्या उजेडापासून दूर ठेवा. तसेच, झोपताना काही विशिष्ट पोझिशन्सकडे लक्ष द्या जेणेकरून हृदयावर किंवा नसांवर दबाव येणार नाही..

डॉ.आतिश म्हणाले की, बीपी नियंत्रित करण्यासाठी छोट्या सवयी खूप उपयुक्त आहेत. झोपताना पायांच्या दिशेने रक्त परिसंचरण खूप जलद होतो. त्यामुळे पायात दाब जाणवतो आणि पायात अस्वस्थता येते. अशा परिस्थितीत योग्य झोपेने उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो. कसे, जाणून घेऊया…

रक्तदाब कमी करण्यासाठी कोणत्या बाजूला झोपावे ?

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीसाठी डाव्या बाजूला झोपणे सर्वोत्तम मानलं जातं, कारण यामुळे रक्तवाहिन्यांवरील जास्त दाब कमी होतो. दुसरीकडे, उजव्या बाजूला झोपल्याने बीपी आणि हृदयाचा धोका वाढतो. अनेक वेळा उजव्या बाजूला झोपल्याने झोपेत वारंवार अडथळा निर्माण होतो, त्यामुळे रक्तदाब आणखी वाढण्याचा धोका असतो. डाव्या बाजूला झोप घेणे ही उच्च रक्तदाबासाठी सर्वोत्तम स्थिती आहे, कारण यामुळे हृदयाला रक्त परत करणाऱ्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो व त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.

हाय बीपीमध्ये उशी घेऊन झोपा..

हाय बीपीच्या समस्येमध्ये पायामध्ये उशी ठेवून झोपणे फायदेशीर मानलं जातं. खरं तर असं होतं की, पायात उशी ठेवली की, बीपी कमी होऊ लागतो आणि रक्ताभिसरण प्रक्रियेला आराम मिळतो. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे पायांची अस्वस्थता कमी होते आणि तुम्ही हाय बीपीची समस्या टाळू शकता..

थंडीत सैल मोजे घालून झोपणे..

याशिवाय जर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सैल मोजे घालून झोपल्याने ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर रहरू शकतं. यामुळे असं केल्यास तुमचा बीपी संतुलित करेल अन् नंतर शरीरातील रक्त परिसंचरण प्रक्रिया सुधारेल, त्यामुळे चांगली झोप लागेल आणि हाय बीपीची समस्या आपोआप नियंत्रणात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.