Diwali Offer : देशातील सर्वात सेफ SUV वर 2.20 लाखांचा डिस्काउंट, पहा, 1 लाखांपेक्षा जास्त डिस्काउंट असलेल्या टॉप 3 Cars
दिवाळीच्या या सणासुदीत मोटारींच्या बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होते. दिवाळीत साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने नवीन कार घरी आणणे लोक शुभ मानतात. अशा परिस्थितीत लोकांची प्रचंड मागणी आणि विक्रीत झालेली वाढ पाहता कार निर्मातेही बंपर डिस्काउंट देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आणि या सणासुदीच्या काळातही तेच पाहायला मिळत आहे.
या सणासुदीच्या काळात सर्वाधिक डिस्काउंट असलेल्या 3 वाहनांवर एक नजर टाकूया…
‘या’ 7 नवीन SUV Cars लवकरच होणार लॉन्च , किंमत फक्त रु. 10-15 लाख
1. Mahindra Alturas G4 :-
या दिवाळीत महिंद्राच्या Alturas G4 SUV वर जास्तीत जास्त सूट मिळत आहे. या कारवर 2,20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट, 20,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त डिस्काउंट आणि 5,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह ऑफर दिली जात आहे. हा डिस्काउंट मार्केटमधील सर्व वाहनांवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट आणि ऑफरपेक्षा जास्त आहे.
2. Mahindra Scorpio :-
या दिवाळीत महिंद्राची आणखी एक कार सर्वाधिक डिस्काउंटच्या बाबतीत सर्वांना मागे सारत या यादीत समाविष्ट झाली आहे जिचे नाव आहे स्कॉर्पिओ. अनेक वर्षांपासून ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. हिच्या स्टँडर्ड मॉडेलवर 1,75,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट 20,000 रुपयांच्या ॲक्सेसरीज आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस कंपनीकडून दिला जात आहे.
3. Volkswagen Taigun :-
फोक्सवॅगनच्या या आलिशान SUV वर 1 लाख रुपयांपर्यंतची बंपर डिस्काउंट दिला जात आहे. अर्थात, गाडीच्या व्हेरिएन्टस नुसार त्यात बदल होत असल्याचे दिसून येते. Tigon चे 1.5L GT मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 50,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस 10,000 रुपयांपर्यंतचे लॉयल्टी बोनस आणि 25,000 रुपयांचे 4 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज उपलब्ध आहे.
‘या’ 7 नवीन SUV Cars लवकरच होणार लॉन्च , किंमत फक्त रु. 10-15 लाख
या SUV च्या 1.5-लीटर ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस 10,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस आणि 25,000 रुपयांचे मोफत सर्व्हिस पॅकेज मिळत आहे. कारच्या 1.0-लिटर TSI प्रकारात 25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस 10,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस आणि 25,000 रुपयांचे मोफत सर्व्हिस पॅकेज दिले जात आहे.
देशातील सर्वात सेफ कार
ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टच्या निकालांनुसार, Taigun ने ‘समोरून टक्कर झाल्यास स्थिर संरचना, वयस्क लोकांसाठी चांगली सुरक्षा आणि बाजूला-टू-साइड टक्कर झाल्यास मध्यम ते चांगले संरक्षण’ दिलं आहे. एकंदरीत एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनात 34 पैकी 30 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 42 गुण मिळविले. अशा प्रकारे याला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या सुरक्षित कारच्या श्रेणीत ती पहिल्या क्रमांकावर आहे.
युटिलिटी आणि सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज :-
Volkswagen Taigun च्या नवीन मॉडेलला काही कॉस्मेटिक अपडेट मिळतात. यात विंडो व्हिझर्स, डोअर-एज प्रोटेक्टर्स, ॲल्युमिनियम पेडल्स, नवीन फॉग लॅम्प्स, बॉडी-कलर डोअर ट्रिम, ब्लॅक-पेंट केलेले ORVM, सी-पिलर आणि रूफ फॉइल यांसारखे फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी, SUV ला 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESC, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), मल्टी-कॉलिजन ब्रेकिंग, रियर पार्किंग डिस्टन्स कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल आणि सेकन्ड रो प्रवाशासाठी 3-पॉइंट सीट बेल्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत.