7 सीटर हुबेहूब Fortuner चं, 24Km पर्यंत मायलेज, 7 एयरबॅग, किंमत तर तिप्पटीने कमी, पहा जबरदस्त फीचर्स अन् किंमत..
टोयोटाने त्यांची लोकप्रिय इनोव्हा ही MPV कार आता हायब्रीड SUV कार म्हणून नव्या 25 नोव्हेंबरला लाँच केली आहे. नव्या हायब्रीडचे नाव Toyota Innova Hycross असं ठेवलं आहे. एकूण 5 मॉडल्स सादर करण्यात आले आहेत. यात जी, जीएक्स, व्हिएक्स झेडक्स, झेडएक्स (ओ) या मॉडेल्सचा समावेश आहे.
23.24 Km पर्यंत मायलेज..
यातील जी व जीएक्स मॉडेल फक्त पेट्रोल कार म्हणून लाँच केली आहे तर व्हिएक्स, झेड एक्स, झेडएक्स (ओ) ही तिन्हीही हायब्रीड कार आहेत. यात पेट्रोल + इलेक्ट्रीकल व्हेईकल असे कॉम्बीनेशन करण्यात आलं आहे. टोयोटा हायक्रॉसच्या पेट्रोल व्हर्जनचे मायलेज 16.13 किमी प्रति लीटर तर हायब्रीड व्हेरियंटचे
23.24 Km प्रति लीटर मायलेज 21.1 असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर ही सर्व मॉडल्स ऑटोमॅटीक स्ट्रान्समिशनची आहेत.
जबरदस्त फीचर्स :-
पूर्वीच्या इनोव्हापेक्षा हायक्रॉसचे लुक अत्यंत आकर्षक असं आहे तर यातील पहिले दोन बेसिक मॉडेल्स हायब्रीड नसून ते फक्त पेट्रोलवर चालणारे आहे. तर उर्वरीत 3 मोडेल्स फिचर्स सर्वांना हायब्रीड आहेत. यात पुढचे तिन्हीही मॉडल्स पेट्रोल + इलेक्ट्रीकल अशी याची इंजिन रचना पहिल्या जी, जीएक्स व्हिएक्स तिनही मॉडेल्सला दोन एअरबॅग, अधिकची साठीची जागा, प्रशस्त बैठक व्यवस्था, इंटरनल अधिकचे चार्जिंग पॉईंटस्, डिस्क ब्रेक्स , चार स्पीकर्स, आठ इंचची टच स्क्रीन तर व्हिएक्समध्ये अतिरिक्त दोन स्पीकर्स अर्थातच सहा स्पीकर्स देण्यात आले आहेत.
इत्यादी सुविधा या सर्व मॉडेल्समध्ये कॉमन आहेत तर झेडएक्स, झेड एक्स (ओ) या टॉप मॉडेल्समध्ये 6 एअर बॅग्ज, एलईडी फॉग लॅम्प्स, ऑटो सिट अँडजेस्टमेंटस् 18 इंचचे व्हिल्स्, जेबीएलचे 8 स्पिकर्स, सनरूफ, उन्हापासून बचावासाठी विंडोकर्टन, 10 इंचची मोठी टचस्क्रीन, वायरलेस अँप्पल कार प्ले, एअर व पोल्युशन फिल्टर, व्हेंटीलेटेड फ्रंट सिटस्, सिट मेमरी फंक्शन पॉवर डिक्लाईन सिट अशी विविध आकर्षक फिचर्स या टॉपमॉडल्समध्ये समाविष्ट आहेत.
तर यातील झेडएक्स (ओ म्हणजेच टॉप मॉडेलमध्ये ADAS हे फिचर अतिरिक्त देण्यात आले आहे ADAS मध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, क्रुझ कंट्रोल, लेन किप असिस्टंट, ऑटो हायबीम, रेअर क्रॉस ट्रफिक अलर्ट, क्रॅश सेफ्टी वॉर्निंग अशी विविध सेफ्टी फिचर्स देण्यात आली आहेत. त्यामुळे साहजिकच ही कार सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
विशेष म्हणजे या सर्व मॉडेल्सला पूरेसा ग्राऊंड क्लिअरन्स देखील देण्यात आला आहे. या कारचे जी, जीएक्स व व्हिएक्स तिन्हीही मॉडेल्स 7 किंवा 8 सीटरमध्ये उपलब्ध आहेत. तर यातील टॉप मॉडेल्स म्हणजेच झेडएक्स व झेडएक्स (ओ) फक्त 7 सीटरमध्ये उपलब्ध आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये इको नॉर्मल पावर व ईव्ही असे चार मोड देण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रीक पावर स्टेअरींग दिल्यामुळे गाडी चालविताना सहजता मिळते सर्व मॉडेल्ससाठी 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे.
कलर ऑप्शन्स
या पाचही मॉडेल्समध्ये प्लॅटिनम् व्हाईट पर्ल, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाईन, ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक, सिल्व्हर मेटालिक, अव्हंत गार्ड ब्रोन्झ मेटालिक, अँटीट्युड ब्लॅक मिका, सुपर व्हाईट असे विविध कलर्ल्स उपलब्ध आहेत.
किती आहे किंमत :-
ही कार 25 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आली असून 15 जानेवारी 2023 पासून ती प्रत्यक्षात ग्राहकांच्या हातात मिळणार आहे. या कराची एक्स शोरूम किंमत पुणे – 21.89 लाख असून सध्या या कारचे जोरदार बुकींग सुरु आहे.