Take a fresh look at your lifestyle.

Share Market : TATA च्या ‘या’ 5 शेयर्सनं 2021 मध्ये केलं मालामाल ; दिले 2000 % रिटर्न्स, तुमच्याकडं आहे का?

0

शेतीशिवार टीम, 27 डिसेंबर 2021 : एकीकडं Covid-19 महामारीमुळे जिथे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असताना तर दुसरीकडं भारतीय शेअर बाजार यावर्षी विक्रमी उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला.

विशेष म्हणजे, अनेक मिड कॅप – स्मॉल कॅप आणि पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहे आणि या वर्षी मोठ्या प्रमाणात मल्टीबॅगर स्टॉक समोर आले आहेत.

भारतातील मल्टीबॅगर शेयर्सच्या ‘या’ यादीत टाटा कंपनीचे काही शेयर्स देखील समाविष्ट आहेत. आपण जाणून घेणार आहोत की, या वर्षीच्या मल्टीबॅगर स्टॉक लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या टाटाच्या टॉप 5 स्टॉक्सबद्दल… ज्यांनी 2021 मध्ये त्यांच्या शेअरधारकांना 2000 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत :-

टाटा पॉवर (Tata Power) :

टाटा पॉवर कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार, हा स्टॉक सुमारे ₹75 वरून ₹215 पर्यंत वाढला आहे, 2021 मध्ये हा 1880 टक्क्यांच्या वार्षिक वाढीच्या जवळ गेला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने 18 ऑक्टोबर 2021 रोजी या वर्षीच्या ₹257.30 च्या शेवटच्या उच्चांकावर मजल मारली, परंतु त्यानंतर स्टॉकवर नफा-बुकिंगचा दबाव राहिला. गेल्या 6 महिन्यांत, या भारतीय इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 75% रिटर्न्स दिले आहेत.

टाटा मोटर्स (Tata Motors) :

टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीच्या इतिहासावरून असे दिसून येते की, ते वर्षानुवर्षे सुमारे ₹185 ते ₹465 वर गेले आहेत. 2021 मध्ये टाटा मोटर्सच्या शेयर्सनी गुंतवणूकदारांना सुमारे 150% रिटर्न्स दिले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने या वर्षी 17 नोव्हेंबर रोजी ₹530.15 ला क्लोजिंग हाय ला टच केलं होतं.

टाटा इलाक्षी (Tata Elxsi) :

बँगलोर मध्ये असलेली कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीचे शेयर्स 2021 मध्ये जवळपास ₹ 1870 वरून ₹ 5460 पर्यंत मजल मारली आहे. या शेयर्समध्ये वर्षभरात सुमारे 190 टक्क्यांची वाढ झाली आहे. 17 नोव्हेंबर 2021 रोजी ₹6595.10 चा विक्रमी उच्चांक गाठल्यापासून मल्टीबॅगर स्टॉकवर विक्रीचा दबाव
आहे.

नेल्को (Nelco) :

टाटा समूहाच्या कंपनीचा समभाग वर्षानुवर्षे ₹200 वरून ₹720 पर्यंत वाढला आहे, 2021 मध्ये जवळपास 260% वाढ नोंदवली आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत त्याच्या गुंतवणूकदारांना जवळपास 120% रिटर्न्स दिले आहेत. परंतु, 19 ऑक्टोबर 2021 रोजी 960.10 रुपयांचा उचांक गाठल्यानंतर सध्या नफा वसुलीमुळे शेयर्स घसरत आहे.

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (Tata Teleservices (Maharashtra) Ltd.) :

हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सपैकी एक आहे ज्याने त्याच्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहे. वर्षानुवर्षे, टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरची किंमत ₹7.8/5 वरून ₹169.85 प्रति शेअर झाली आहे, 2021 मध्ये 2000 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.