शेतीशिवार टीम, 28 जानेवारी 2022 : गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारात विक्री सुरू आहे. या वातावरणातही काही स्मॉल कॅप शेयर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. असाच एक स्टॉक आहे भक्ती जेम्स अँड ज्वेलरीचा (Bhakti Gems and Jewellery) . या फॅशन आणि ज्वेलरी कंपनीच्या स्टॉकने अवघ्या 6 ट्रेडिंग दिवसांत 46% रिटर्न्स दिले आहे.
गेल्या 6 ट्रेडिंग दिवसांमध्ये, भक्ती जेम्स अँड ज्वेलरीच्या शेअरच्या किमतीत 13 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 19 जानेवारी 2022 रोजी बीएसई (BSE) निर्देशांकावरील शेअरची किंमत 29.05 रुपये होती, जी आता 42.65 रुपये झाली आहे.
या कालावधीत सुमारे 46% वाढ नोंदवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, शेयर्सने 5 पैकी 3 सत्रांमध्ये 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला धडक दिली आहे. भारतीय शेअर बाजारात कमजोरी असताना हे घडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गेल्या एका महिन्यात, भक्ती जेम्स अँड ज्वेलरी स्टॉकची किंमत रु. 14.71 वरून रु. 42.65 पर्यंत वाढली आहे, जी या कालावधीत 190% वाढ दर्शवते. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, स्टॉक 17.85 रुपयांवरून 42.65 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत जवळपास 140% वाढ झाली आहे.
Bhakti Gems and Jewellery ने भारतीय एक्स्चेंजला गेल्या एका वर्षात केलेल्या घाऊक सौद्यांची माहिती दिली आहे. या घाऊक व्यवहाराचे तपशील BSE वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
नवीन गुप्ता, याकुबली अयुब मोहम्मद, विजय चंदुमल देवनानी, कुणाल अशोक कुमार शाह, संजय डे, सुमित लाहा आदी छोट्या गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे.