शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : चिनी मोबाईल फोन निर्माता कंपनी Vivo यापुढे IPL चे टायटल स्पॉन्सर असणार नाही. त्यांच्या जागी टाटा समूहाला आयपीएलचे नवे टायटल प्रायोजक बनवण्यात आलं आहे.
आयपीएलचा पुढील सीझन आता ‘टाटा आयपीएल’ म्हणून ओळखला जाणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आयपीएलचा आगामी हंगाम (2022) टाटा आयपीएल म्हणून ओळखला जाईल. ब्रिजेश पटेल म्हणाले की विवोने अधिकार हस्तांतरित करण्याची विनंती केली होती, जी गव्हर्निंग कौन्सिलने मंजूर केली. या अधिकारांच्या हस्तांतरणामुळे बीसीसीआयला 440 कोटी रुपये मिळतील.
देशातील वाढत्या चीनविरोधी भावनांमुळे 2020 मध्ये Vivo ने IPL प्रायोजकत्व सोडले. त्यानंतर Dream11 आयपीएलचा टायटल स्पॉन्सर बनला. त्यानंतर विवोने 2021 मध्ये मुख्य प्रायोजक म्हणून पुनरागमन केले.
परंतु आता 2022 च्या सीझननंतर विवोचे प्रायोजकत्व संपुष्टात येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, विवो कंपनी आयपीएलच्या प्रायोजकत्वाचा करार सुरू ठेवण्यास तयार नाही. Vivo आणि BCCI यांनी 2018 मध्ये IPL टायटल स्पॉन्सरशिपसाठी 440 कोटी रुपयांचा करार केला होता. हा करार आयपीएल 2022 च्या हंगामानंतर संपणार होते.
TATA to replace VIVO as IPL title sponsor next year: IPL Chairman Brijesh Patel to ANI pic.twitter.com/n0NVLTqjjG
— ANI (@ANI) January 11, 2022
आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आल आहे. यावेळी आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवीन संघ सर्वांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यांमध्येही वाढ होणार आहे.
खेळाडूंच्या लिलावाची तारीखल दोन आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता आयपीएलचा मेगा लिलाव हा आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे समोर आले आहे.
त्याचबरोबर हा लिलाव दोन दिवस चालेल, असेही सांगण्यात येत आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने याबाबतची सर्व माहिती आयपीएलमधील संघ मालकांना दिलेली आहे.
त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलच्या या मेगा लिलावाची उत्सुकता लागलेली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार 7 आणि 8 फ्रेबुवारी रोजी बेंगळुरू येथे आयपीएल 2022 साठीचा मेगा लिलाव होईल.