शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : आजकाल आधार कार्ड हे प्रत्येकासाठी खूपच महत्वाचं झालं आहे, मग ते लहान मूल का असेना. आधार जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या मते, अगदी नवजात मुलासाठीही आधार कार्ड बनवणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप तुमच्या मुलाचं आधार कार्ड बनवलं नसेल तर तुम्ही घरच्या घरी मुलांचे आधार कार्ड कसं बनवायचं ते जाणून घेउयात…
कसं बनवाल तुमच्या मुलाचं बाल आधार कार्ड :-
>> मुलाच्या आधार नोंदणीसाठी, तुम्ही तुमच्या शेजारच्या पोस्ट ऑफिस, बँक किंवा आधार सेवा केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता.
>> यासाठी सर्वप्रथम आधार नोंदणी केंद्रावर जाऊन फॉर्म भरा.
>> मुलाच्या पालकांपैकी एकाचे जीवन प्रमाणपत्र केंद्रावर घेऊन जा.
>> मुलाचे जन्म प्रमाणपत्र सादर करा. हा फॉर्म सर्व आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर मुलाचा फोटो घेतला जाईल.
>> मुलाचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त असल्यास, फॉर्म सादर केल्यानंतर मुलाची बायोमेट्रिक रेकॉर्ड नोंदवली जाईल.
>> दुसरीकडे मुल 5 वर्षांपेक्षा कमी असेल तर फोटो पुरेसा आहे.
>> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, एक नावनोंदणी स्लिप तयार केली जाईल आणि तुम्हाला दिली जाईल. त्यावर नावनोंदणी आयडी, क्रमांक आणि तारीख टाकली जाईल.
>> या एनरोलमेंट आयडीच्या मदतीने तुम्ही आधार कार्डची स्थिती तपासू शकाल.
>> आधार नोंदणीनंतर 90 दिवसांच्या आत अर्जदाराच्या घरी पोस्टाने पाठवलं जातं.
>> आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा आणि नोंदणी क्रमांक, तारीख आणि वेळ प्रविष्ट करा. अर्ज केल्यानंतर 25-30 दिवसांनी आधार कार्ड डाउनलोड करता येईल.
आधार केंद्रात ही माहिती देऊ नका…
5 वर्षांखालील मुलांसाठी फिंगर प्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅन होणार नाही.
5 वर्षांवरील मुलांसाठी बायोमेट्रिक्स अनिवार्य असेल.
हे जाणून घ्या की, मुलांचे वय 5 पेक्षा कमी असेल तर तर पालकांच्या बोटांचे स्कॅनिंग केलं जातं.